जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 फेब्रुवारी

bhavishya
bhavishya

दिनमान 24 फेब्रुवारी 2020 

मेष : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित आर्थिक कामे होतील. 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल. नोकरी, व्यवसायातील कामे पूर्ण होतील. 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन मार्ग दिसेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. 

कर्क : मनोबल कमी असणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. 

सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साहाने कार्यरत राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

कन्या : काहींची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. 

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रात उत्साह राहाल. मानसन्मानाचे योग येतील. 

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींना अपेक्षित प्रवास संभवतात. 

मकर : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे होतील. 

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. 

पंचांग 24 फेब्रुवारी 2020 
सोमवार : फाल्गुन शुद्ध 1, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय सकाळी 7.28, चंद्रास्त सायंकाळी 7.22, भारतीय सौर फाल्गुन 5, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com