जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 जून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

मेष : तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक क्षेत्रात मनासारखी स्थिती राहणार आहे.

वृषभ : आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ होणार आहेत. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे. तुमचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

मेष : तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक क्षेत्रात मनासारखी स्थिती राहणार आहे.

वृषभ : आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ होणार आहेत. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे. तुमचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या वैचारिक व मानसिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. आत्मविश्‍वास व मनोबल याच्या जोरावर कठीण संकटाशी सामना करू शकाल.

कर्क : कोणत्याही मोठ्या व्यवहारात अडकू नका. ग्रहस्थिती प्रतिकूल आहे. व्यवसायात नुकसानीची शक्‍यता आहे. कामाचा ताण वाढेल,दगदग वाढेल. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता अधिक आहे.

सिंह : अनेक समस्या मार्गी लागणार आहेत. अनेकजणांची तुम्हाला साथ लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात चांगले वातावरण राहील. मनोरंजनाकडे अधिक लक्ष राहणार आहे.

कन्या : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. केटरिंग, पेंटस्‌, साडी सेंटर, ज्वेलर्स यांना आर्थिक लाभ होणार आहेत.कितीतरी अडचणी आपोआप कमी होणार आहेत.

तुळ : सर्वत्र यश व सफलता लाभणार आहे. सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात अनेक जणांचे सहकार्य लाभणार आहे. तुमचे अनुभवाच्या कक्षा व्यापक होणार आहेत. मीडियाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे.

वृश्‍चिक : व्यवसायात तुम्ही नवीन कल्पना अंमलात आणू शकाल. वृत्तपत्र, कायदा, लेखन, प्रकाशन, बॅंकिंग या क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

धनु : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय नकोत. एखादी गुप्त बातमी समजेल. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.

मकर : मानसिक उत्साह व प्रसन्नता लाभेल. अनेक अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. डॉक्‍टर्स व मेडिसीन या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष फायदा होईल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

मीन : हाती घेतलेल्या कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 24 June 2019