जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : २५ डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

आजचे दिनमान
मेष : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायात नवीन उलाढाल करू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल. 

वृषभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. दैनंदिन कामे पार पडतील. प्रवास सुखकर होतील. काहींना गुरूकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील. 

आजचे दिनमान
मेष : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायात नवीन उलाढाल करू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल. 

वृषभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. दैनंदिन कामे पार पडतील. प्रवास सुखकर होतील. काहींना गुरूकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील. 

मिथुन : शासकीय कामात यश लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. 

कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी चिंता लागून राहील. काहींना नैराश्‍य जाणवेल. मह्त्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 

कन्या : मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित सहकार्य लाभेल. 

तुळ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. शासकीय कामात यश लाभेल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होवू शकाल. 

वृश्‍चिक : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. नातेवाईकांसाठी खर्च कराल. नव्या उमेदीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. आरोग्य उत्तम राहील. 

धनु : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता आहे. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. 

मकर : आरोग्य चांगले राहणार आहे. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. 

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिका कार्याकडे ओढा राहील. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. 
मीन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील. संततिसौख्य लाभेल. 

पंचांग
मंगळवार : मार्गशीर्ष कृ. 3, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.04, चंद्रोदय रा. 8.56, चंद्रास्त स. 9.32, अंगारक चतुर्थी, ख्रिसमस, भारतीय सौर पौष 4, शके 1940. 

दिनविशेष 

  • 1998 : संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ.कलानाथ शास्त्री व प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा.कल्याणदत्त शर्मा यांना "राष्ट्रपती पुरस्कार' जाहीर. 
  • 2010 : "इस्रो'ला भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या (जीएसएलव्ही एफ 06) उड्डाणात अपयश. 
  • 2011 : पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या बेमुदत निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या समाधन घोडकेने चंद्रहार पाटीलला एक तास 50 मिनिटांच्या लढतीनंतर कलागंज डावावर चितपट केले. 
  • 2014 : गुजरातमधील सबरकांथा जिल्ह्यातील 4 लाख 85 हजार 47 लोकांनी जिल्ह्यातील 1890 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत नवा विश्‍वविक्रम केला.
Web Title: Horoscope and Panchang of 25 Decembet 2018