जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान 25 जानेवारी 2020 

मेष : तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. 

वृषभ : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज तुमचे कशातही लक्ष लागणार नाही. काहींना नैराश्‍य जाणवेल. 

कर्क : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. 

सिंह : मानसिक स्वास्थ्य कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. 

कन्या : मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

तूळ : आशावादीपणाने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायातील कामे विनासायास पूर्ण होतील. 

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. 

धनू : काहींना अचानक धनलाभ संभवतो. उधारी, उसनवारीची कामे पूर्ण होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मकर : चिकाटी वाढणार आहे. अनेक कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल. 

कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. 

मीन : काहींना विविध लाभ होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. प्रवास सुखकर होतील. 

पंचांग 25 जानेवारी 2020 
शनिवार : माघ शुद्ध 1, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 7.26, चंद्रास्त सायंकाळी 6.55, भारतीय सौर माघ 5, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com