जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 जुलै

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 जुलै

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाची प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

वृषभ : लांबच्या प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

मिथुन : व्यवसायामध्ये नवीन उपक्रम राबवाल. मुलामुलींच्या संदर्भातील घेतलेले निर्णय अचूक ठरतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 

कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. विरोधकावर मात कराल. 

सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण व दगदग वाढण्याची शक्‍यता आहे. व्यवसायामध्ये कामकाजाचे प्रमाण वाढणार आहे. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

तूळ : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलू शकाल. 

वृश्‍चिक : काहींना वरिष्ठांचा, गुरुवर्यांचा सहवास लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवाल. मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती नाही. 

मकर : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये काही संधी चालून येतील. 

कुंभ : वैवाहिक जीवनात कमी-जास्त प्रमाणात कटकटी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. वादविवादामध्ये समोरच्याचे मत जाणून घ्यावे. 

मीन : आर्थिक उलाढाल वाढणार आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्‍तींना सुयश लाभेल. आरोग्य चांगले राहील. 

पंचांग
गुरुवार : आषाढ कृष्ण 8, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय रात्री 12.08, चंद्रास्त दुपारी 12.55, कालाष्टमी, भारतीय सौर श्रावण 3, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 25 July 2019