जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : 9 मे

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान
मेष : काहींना गुरूकृपा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. हितशत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. प्रवासात विशेष दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

कर्क : प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. महत्त्वाच्या वस्तू हरविण्याची शक्‍यता आहे. वाहने चालवताना विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही क्षेत्रात धोका पत्करू नका. 

सिंह : निर्णय व अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे. खर्च वाढणार आहेत. मनोबलाच्या जोरावर अडचणीवर मात कराल. काहींना गुरूकृपा लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण व दगदग वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. 

तुळ : आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कलाकारांना चांगली संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवणार आहे. 

धनु : आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. साडेसातीची विशेष तीव्रता जाणवेल. 

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना खबरदारी हवी. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल. 

कुंभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

मीन : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष फायदा होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य चांगले राहणार आहे. 

पंचांग 
गुरुवार : वैशाख शुद्ध 5, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.05, सूर्यास्त 6.59, चंद्रोदय सकाळी 9.36, चंद्रास्त रात्री 11.20, आद्य शंकराचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख 19, शके 1941.

दिनविशेष 
1999 :
ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅंड पिरिक्‍स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत 1 तास 17 मिनिटे व 46 सेकंदात पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. 
2003 : हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या "अस्त्र' या पूर्णपणे देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित करणारा भारत हा रशिया आणि "नाटो' संघटनेबाहेरील पहिलाच देश ठरला आहे. 
2006 : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्‍स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये (नासा) ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार भारताच्या चांद्रमोहिमेच्या वेळी "चांद्रयान-1' या यानाबरोबर "नासा'ची दोन उपकरणेही बरोबर नेण्यात येणार आहेत. 
2018 : बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2015मध्ये इराणबरोबर करण्यात आलेल्या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com