जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पंचांग 25 नोव्हेंबर 2019 
सोमवार : कार्तिक कृष्ण 14, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.50, सूर्यास्त 5.55, चंद्रोदय पहाटे 5.12, चंद्रास्त सायंकाळी 5.08, शिवरात्री, भारतीय सौर मार्गशीर्ष 4, शके 1941. 

दिनमान 25 नोव्हेबर 2019 
मेष : उत्साहाने कार्यरत रहाल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. 

वृषभ : अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे. 

मिथुन : व्यवसायात कमालीची वाढ होवू शकेल. एखादी चांगली बातमी समजेल. व्यवसायात सुधारणा करू शकाल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च कराल. 

सिंह : तुमचे व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे. 

कन्या : मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

तूळ : तुमच्या कार्याचा तुम्ही ठसा उमटवू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

वृश्‍चिक : पायाला दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने चालवताना विशेष दक्षता हवी. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्याची घटना घडेल. मित्रांची विशेष मदत मिळेल. जुने येणे वसूल होईल. 

मकर : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. कामाचे ताणतणाव वाढतील. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. योजलेली कामे पार पडतील. 

मीन : शुभ कामे टाळावीत. काहींना अचानक धनलाभ होतील. प्रवासात विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. 

पंचांग 25 नोव्हेंबर 2019 
सोमवार : कार्तिक कृष्ण 14, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.50, सूर्यास्त 5.55, चंद्रोदय पहाटे 5.12, चंद्रास्त सायंकाळी 5.08, शिवरात्री, भारतीय सौर मार्गशीर्ष 4, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 25 November 2019