जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पंचांग 25 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद कृष्ण 11, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, चंद्रोदय रात्री 2.29, चंद्रास्त दु. 4.02, इंदिरा एकादशी, एकादशी-द्वादशी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 3, शके 1941. 

दिनांक : 25 सप्टेंबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : ग्रहमान सामान्य स्वरूपाचे आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. 

वृषभ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैचारिक प्रभाव वाढेल. बॅंकिंग, विमा क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. 

मिथुन : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. जिद्द व धाडस यामुळे तुम्ही यश संपादन करू शकाल. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहेत. 

सिंह : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मात्र, धाडस टाळावे. शुभ कामे नकोत. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आरोग्य चांगले राहील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

तूळ : काहींना प्रवासाचे योग येतील. उत्साह, उमेद वाढेल. प्रत्येक बाबतीत सावधगिरी व जागरूकता हवी. 

वृश्‍चिक : धाडसाने निर्णय घ्याल. अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. 

धनू : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. आत्मविश्‍वासाच्या जोरावर व्यवसायात यश मिळवू शकाल. सार्वजनिक कार्यात प्रभाव वाढेल. 

मकर : दिवस बराचसा समाधानकारक आहे. तुमच्या कार्यात सफलता मिळणार आहे. संधी मिळणार आहे. 

कुंभ : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. तुम्हाला प्रत्येकबाबतीत जपून व्यवहार करावे लागतील. निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. 

मीन :तुमची मन:स्थिती चांगली राहणार आहे. कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. 

पंचांग 25 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद कृष्ण 11, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, चंद्रोदय रात्री 2.29, चंद्रास्त दु. 4.02, इंदिरा एकादशी, एकादशी-द्वादशी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 3, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 25 September 2019