जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : २६ डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

आजचे दिनमान 

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीच्या कामासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. 

वृषभ : आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. 

आजचे दिनमान 

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीच्या कामासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. 

वृषभ : आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. 

मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दुपारनंतर नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. काहींना गुरूकृपा लाभेल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. दुपारनंतर व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. 

सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. दुपारपूर्वी काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रियजनांचा सहवास लाभेल. 

तुळ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. अनेकांशी सुसंवाद साधू शकाल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

वृश्‍चिक : सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेल्या कामांना चालना मिळेल. काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. 

धनु : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास सुखकर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

मकर : मह्त्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर एखादी चिंता लागून राहील. काहींना नैराश्‍य जाणवेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. वादविवाद शक्‍यतो टाळावा. 

कुंभ : गडी, नोकरचाकर यांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. संततिसौख्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. 

मीन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. दुपारनंतर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास सुखकर होतील.

पंचांग
बुधवार : मार्गशीर्ष कृ. 4, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय रा. 10, चंद्रास्त स. 10.25, भारतीय सौर पौष 5, शके 1940. 

दिनविशेष 

  • 1998 : पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळातर्फे ज्येष्ठ लावणी गायिका सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार प्रदान. 
  • 2003 : अवकाश प्रणोदक तंत्रज्ञानातील (स्पेस प्रॉपेलेंट टेक्‍नॉलॉजी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) "सतीश धवन विशेष प्राध्यापक' हे पद जाहीर करून त्यांचा आगळा सन्मान केला. 
  • 2004 : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ झालेला भूकंप आणि त्यामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा भारताची दक्षिण किनारपट्टी व श्रीलंकेसह हिंदी महासागरातील मोठ्या टापूत बसलेल्या फटक्‍याने हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. सुमात्रा बेटांत केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता 8.9 रिश्‍टर होती. 
  • 2007 : ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार यांना "महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-जीवन व कार्य' या चरित्रग्रंथासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
Web Title: Horoscope And Panchang Of 26 December 2018