जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

पंचांग 26 नोव्हेंबर 2019 
मंगळवार : कार्तिक कृष्ण 30, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.50, सूर्यास्त 5.55, दर्श अमावास्या, भारतीय सौर मार्गशीर्ष 5, शके 1941. 

दिनमान 26 नोव्हेबर 2019 

मेष : शासकीय कामे कटाक्षाने टाळावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. 

वृषभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. शासकीय कामात यश मिळेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नोकरीत सामान्य स्थिती राहील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

कर्क : शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च कराल. 

सिंह : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. 

कन्या : काही निर्णय धाडसाने घ्याल. काहींना प्रवासाचे योग येतील. विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी व्हाल. 

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. व्यवसायात लाभदायक घटना घडतील. 

वृश्‍चिक : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्याकडे एखादी विशेष कामगिरी सोपवण्यात येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. 

धनू : शासकीय कामे कटाक्षाने टाळावीत. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मकर : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विशेषत: शासकीय कामांकडे लक्ष द्यावे. दानधर्माकरिता खर्च कराल. 

कुंभ : तुमच्या अनुभवाचे क्षेत्र व्यापक होणार आहे. अनेकांना तुमचे नेतृत्व मान्य करावे लागेल. प्रवासाचे योग येतील. 

मीन : महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. विरोधकावर मात कराल. 

पंचांग 26 नोव्हेंबर 2019 
मंगळवार : कार्तिक कृष्ण 30, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.50, सूर्यास्त 5.55, दर्श अमावास्या, भारतीय सौर मार्गशीर्ष 5, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 26 November 2019