जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पंचांग 26 सप्टेंबर 2019 
गुरुवार : भाद्रपद कृष्ण 12, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा/मघा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय पहाटे 3.33, चंद्रास्त दुपारी 4.54, प्रदोष, मघा - त्रयोदशी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 4, शके 1941. 

दिनांक : 26 सप्टेंबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. काहींना नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिकबाबतीत धाडस टाळावे. 

वृषभ : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींच्या बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

मिथुन : व्यवसायाच्या बाबतीत संमिश्र स्थिती राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. प्रवास सुखकारक होणार आहेत. 

कर्क : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या क्षेत्रामध्ये सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

सिंह : आरोग्य चांगले राहील. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होतील. सर्व क्षेत्रांत आर्थिक लाभ होणार आहेत. 

कन्या : महत्त्वाची शुभ कामे टाळावीत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. भागीदारी व्यवसायात वातावरण चांगले राहील. 

तूळ : मित्रांचे सहकार्य लाभेल. मात्र ग्रहमान सर्व बाबतींत प्रतिकूल आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. फसवणुकीची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. तुमच्या शब्दाला मान मिळेल. 

मकर : प्रवासाचे योग टाळावेत. सामाजिक व सार्वजनिक कार्यात व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुमची पावले वेगाने पडतील. 

कुंभ : सर्व बाबतींत प्रतिकूलता आहे. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. व्यवसायात अडचणी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. आरोग्य चांगले राहणार आहे. वैचारिक क्षेत्रात विशेष कामगिरी नोंदवू शकाल. 

पंचांग 26 सप्टेंबर 2019 
गुरुवार : भाद्रपद कृष्ण 12, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा/मघा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय पहाटे 3.33, चंद्रास्त दुपारी 4.54, प्रदोष, मघा - त्रयोदशी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 4, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 26 September 2019