जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

वृषभ : प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. वाटाघाटी, परिचय होतील. 

मिथुन : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. धाडसाने निर्णय घेण्यास हरकत नाही. तुमचा प्रभाव सतत वाढणार आहे. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

सिंह : शुभ कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो नकोत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 
तूळ : व्यवसाय वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. प्रवासाचे योग येतील. 

वृश्‍चिक : सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. सौख्याचे, समाधानाचे वातावरण राहील. सार्वजनिक जीवनात सतत यश मिळणार आहे. 

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेद राहतील. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. 

मकर : आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकारक होणार आहेत. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. वैद्यकीय क्षेत्रात व मेडिकल क्षेत्रात यश मिळेल. 

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

पंचांग 28 ऑगस्ट 2019 
बुधवार : श्रावण कृष्ण 13, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.52, चंद्रोदय पहाटे 3.43, चंद्रास्त सायंकाळी 5.22, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर भाद्रपद 6, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com