जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 फेब्रुवारी

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 फेब्रुवारी

दिनमान 28 फेब्रुवारी 2020 
मेष : दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. 

वृषभ : कामाचा ताण होईल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. 

मिथुन : आर्थिक लाभ होतील. काहींना विविध लाभ होतील. प्रवास होणार आहेत. 

कर्क : नवा मार्ग दिसेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. 

सिंह : नवी दिशा सापडेल. गेले दोन दिवस जाणवणारी अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. 

कन्या : आत्मविश्‍वासाचा अभाव राहील. कामे रखडणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. 

तूळ : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुमचा प्रभाव वाढणार आहे. सकारात्मकपणे कार्यरत रहाल. 

वृश्‍चिक : खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामे विलंबाने मार्गी लागतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

धनू : तुमचा बौद्धिक प्रभाव असणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस अनुकूल जाईल. मनोबल वाढेल. 

मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. चिकाटी वाढणार आहे. 

कुंभ : तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. 

मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

पंचांग 28 फेब्रुवारी 2020 
शुक्रवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय 9.46, चंद्रास्त रात्री 10.34, भारतीय सौर फाल्गुन 9, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com