जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 28 नोव्हेंबर

bhavishya
bhavishya

दिनांक : 28 नोव्हेबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. 

वृषभ : महत्त्वाची कामे कटाक्षाने टाळावीत. प्रवासात अडचणी येतील. एखादी मनाविरुद्ध घटना घडणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

मिथुन : व्यवसायात विशेष यश मिळणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 

कर्क : आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कामाचा ताण जाणवेल. 

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात नवीन प्रयोग किंवा नवीन तंत्रमंत्र अमलात आणण्यास दिवस चांगला आहे. 

कन्या : व्यवसायाची उलाढाल वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या मोठ्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. 

तूळ : तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे अनुभव व्यापक होणार आहेत. 

वृश्‍चिक : व्यवसयात धाडस करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. कलाकारांना संधी मिळणार आहे. 

धनू : तुमच्या विचारांना अनुकूल दिशा मिळेल. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. 

मकर : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. 

कुंभ : फार मोठे यश लाभणार आहे. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. ग्रहमान विशेष अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मीन : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. 

पंचांग 28 नोव्हेंबर 2019 
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 2, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.51, सूर्यास्त 5.55, चंद्रोदय सकाळी 8.14, चंद्रास्त सायंकाळी 7.40, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष 7, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com