जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : २९ जानेवारी

Horoscope And Panchang Of 29 January 2019
Horoscope And Panchang Of 29 January 2019

आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष काय आहे?

आजचे दिनमान 
मेष :
प्रवास शक्‍यतो टाळावेत. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. जुने येणे वसूल होईल. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. 

वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. प्रवास सुखकर होतील. ग्रहमान चांगले असल्यामुळे अनेक कामे उरकून घ्यावीत. 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्याकरिता खर्च होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्याकडे विशेष लक्ष हवे. प्रवास टाळावेत. कोणतेही धाडस टाळावे. 

कर्क : कर्क व्यक्‍तींना दिवस अत्यंत चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात काही चांगल्या घटना घडतील. दिवस चांगला असल्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. 

सिंह : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष हवे. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकारक होणार आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यात चांगली संधी मिळणार आहे. 

तुळ : बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. जुने येणे वसूल होईल. व्यवसायात उलाढाल वाढेल. 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहणार आहे. संततिसौख्य, वैवाहिक सौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह, उमेद वाढेल. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रवास सुखकारक होतील. 

धनु : महत्त्वाची कामे नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस करू नका. 

मकर : आर्थिक क्षेत्रात चांगले यश लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. 

कुंभ : व्यवसाय वाढेल, सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोबल वाढेल. प्रवास सुखकारक होणार आहेत. तुमच्या कार्यात यश लाभेल. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. 

मीन : प्रवासाचे योग येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक़, शैक्षणिक व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकारक होतील.

पंचांग
मंगळवार : पौष कृष्ण पक्ष 9, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.29, चंद्रोदय रात्री 1.43, चंद्रास्त दुपारी 1.16, भारतीय सौर माघ 9, शके 1940. 

दिनविशेष 
राष्ट्रीय वृत्तपत्र दिन - दिनविशेष 

  • 2001 : जागतिक जलतरण मालिकेत चीनच्या क्वी हुई हिचा 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत विश्‍वविक्रम. तिने ही शर्यत दोन 
  • मिनिटे 19.25 सेकंद वेळेत पूर्ण केली. 
  • 2003 : पुण्यातील कॅप्टन सुशांत गोडबोले व अन्य पाच अधिकारी जम्मूजवळील रणवीरसिंगपुरा भागात सैन्याने पूर्वी पेरलेले सुरुंग काढण्याचे काम करत असताना झालेल्या स्फोटात हुतात्मा झाले. 
  • 2006 : भारताचा दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने "स्वीस मिस' मार्टिना हिंगीसच्या साथीत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले. यामुळे भूपतीने ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. 
  • 2015 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर या वर्षी झालेल्या संचलनातील सुमारे 26 चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा अद्वितीय सांस्कृतिक सोहळा असलेल्या "पंढरीची वारी' या विषयावरील चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला. 
  • 2015 : संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध संगीतकार शेखर सेन यांची निवड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com