जाणून घ्या आजचे भविष्य आणि दिनमान : 29 मे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि दिनमान : 29 मे

आजचे दिनमान 
मेष : प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. कोणत्याही गोष्टीत धाडस टाळावे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करण्यासाठी अनुकूलता लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कामाचा ताण जाणवेल. 

कर्क : सर्व क्षेत्रात सफलता लाभणार आहे. सभासमारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

सिंह : मनस्थिती चंचल राहील. जागा, जमिनी या क्षेत्रात विशेष यश मिळेल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. आरोग्याची साथ चांगली असणार आहे. अनुभवाचे क्षेत्र व्यापक होणार आहे 

तूळ : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याकडे लक्ष हवे. 

धनू : व्यवसायात थोडी प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्यात उणीव जाणवेल. 

मकर : प्रवासाचे विशेष योग येतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. व्यवसायात वाढ करू शकाल. 

मीन : तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. मनोरंजनावर खर्च कराल. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. 

पंचांग
बुधवार : वैशाख कृष्ण 10, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.07, चंद्रोदय रात्री 2.25, चंद्रास्त दुपारी 2.46, भारतीय सौर ज्येष्ठ 8, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 29 May 2019