जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै

आजचे दिनमान 
मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल. 

वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल. 

मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. 

कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल. 

कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. 

वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल. 

धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे. 

मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल. 

कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये. 

मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे. 

पंचांग
मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 30 July 2019