जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पंचांग 4 ऑक्‍टोबर 2019 
शुक्रवार : आश्‍विन शुद्ध 6, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.21, चंद्रोदय सकाळी 11.46, चंद्रास्त रात्री 11.15, भारतीय सौर आश्‍विन 12, शके 1941. 

दिनांक : 4 ऑक्‍टोबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय नकोत. आर्थिकबाबतीत धाडस नको. 

वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कामाचा ताण व दगदग वाढेल. संततिसौख्य लाभेल. 

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. 

सिंह : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. अकारण खर्च करावे लागणार आहेत. कलेच्या क्षेत्रात संधी लाभेल. 

कन्या : मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. आर्थिक आवक समाधानकारक राहील. साडी सेंटर्स, ज्वेलर्स व केटरर्स यांना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. 

तूळ : अनपेक्षित अडचणी येणार आहेत. कोणत्याही गोष्टी गृहीत धरू नका. मात्र, आरोग्य चांगले राहील. 

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

धनू : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कुंभ : परिस्थिती सुधारत आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभेल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

पंचांग 4 ऑक्‍टोबर 2019 
शुक्रवार : आश्‍विन शुद्ध 6, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.21, चंद्रोदय सकाळी 11.46, चंद्रास्त रात्री 11.15, भारतीय सौर आश्‍विन 12, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 4 October 2019