जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 जून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 जून

आजचे दिनमान 
मेष : इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. चिकाटीच्या जोरावर यश मिळवू शकाल. नवा मार्ग दिसेल. 

वृषभ : शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची मदत मिळेल. 

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. उत्साहाच्याभरात चुकीचे निर्णय राबवले जातील. स्पष्ट व कटू बोलणे टाळावे. 

कर्क : व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. खर्च अकारण वाढणार आहेत. आपण फसत नाही ना याचा विचार अधिक करावा. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. 

कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल, कटू व स्पष्ट बोलणे टाळावे. 

तूळ : वाटचाल योग्य मार्गावरून चालू आहे. असामान्य यश मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : अत्यंत टोकाच्या अडचणी जाणवतील. कोणत्याही क्षेत्रात धाडस नको. प्रवास टाळता आले तर योग्य ठरेल. 

धनू : आरोग्य बिघडण्याची दाट शक्‍यता आहे. प्रत्येक दिवस अडचणी वाढवणारा ठरणार आहे. व्यवसायात सतत अडचणी येत असल्यामुळे कंटाळून जाल. 

मकर : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. हाताखालील व्यक्‍तींची कठोर वागण्यामुळे नुकसान होणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

कुंभ : नवे स्नेहसंबंध जुळतील. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. जनसंपर्क वाढणार आहे. 

मीन : कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी मिळणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

पंचांग
बुधवार : ज्येष्ठ शुद्ध 2, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय सकाळी 7.32, चंद्रास्त रात्री 9.14, रंभाव्रत, रमजान ईद, मु. शब्बाल मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ 15, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 5 June 2019