जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

मेष : कामामध्ये अडचणी येतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. शासकीय कामात यश मिळेल. 

वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

मिथुन : जबाबदारी वाढेल. कामात दगदग वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. खर्च वाढणार आहेत. नोकरीमध्ये सामान्य स्थिती राहील. 

आजचे दिनमान 

कर्क : प्रॉपर्टीच्या कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील. मानसिक ताणतणाव वाढतील. प्रवासात दक्षता हवी. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कोणत्याही कामासाठी दिवस शुभ आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक आवक अधिक राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 

वृश्‍चिक : नको ती बातमी समजेल. दिवस खूप प्रतिकूल आहे. प्रवास कटाक्षाने टाळावेत. प्रत्येक गोष्ट करताना आपण योग्य ती दक्षता घ्यावी. 

धनू : एखादी मनाविरुद्ध घटना घडणार आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. दैनंदिन व्यवहारात फसवणुकीची शक्‍यता आहे. 

मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. 

कुंभ : नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रॉपर्टी खरेदीसाठी व कोणत्याही व्यवहारासाठी दिवस शुभ आहे. अनेकांची मैत्री संपादन करू शकाल. 

मीन : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

पंचांग
गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय सकाळी 8.32, चंद्रास्त रात्री 10.12, विनायक चतुर्थी, गुरुपुष्यामृत (20.28 नंतर सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर ज्येष्ठ 16, शके 1941.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 6 June 2019

टॅग्स