जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 सप्टेंबर

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. अनपेक्षितपणे मनस्ताप होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार विलंबाने होणार आहेत. 

वृषभ : आरोग्य चांगले राहील. जबाबदारी वाढणार आहे. मित्रांचे व नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. धाडस करताना विचार करावा. 

मिथुन : कामामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कर्क : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अनेकांची मदत मिळेल. उत्साह, उमेद वाढेल. खर्चावर नियंत्रण हवे. 

सिंह : प्रवास सुखकारक होणार आहेत. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. तुमच्या विचारांची छाप पडेल. 

कन्या : मनोबल वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढेल. 

तूळ : शेअर्समध्ये व व्यवसायात आर्थिक लाभ होतील. तुमचे व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असले तरी त्यात फायदा होणार आहे. 

वृश्‍चिक : दिवस आनंदात जाणार आहे. व्यवसायाची वाढ अपेक्षेप्रमाणे होणार आहे. प्रतिष्ठा व अधिकार लाभेल. 

धनू : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तुमच्यावर एखादी विशेष जबाबदारी सोपवली जाईल. 

मकर : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आपण चुकीच्या प्रकरणात अडकत नाही ना याची दक्षता घ्यावी. 

कुंभ : प्रगती वेगाने होणार आहे. व्यवसायात फायदा होईल. कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभणार आहे. 

मीन : सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. 

पंचांग 6 सप्टेंबर 2019 
शुक्रवार : भाद्रपद शुद्ध 8, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.45, चंद्रोदय दुपारी 12.58, चंद्रास्त रात्री 11.56, दुर्गाष्टमी, गौरी पूजन, भारतीय सौर भाद्रपद 15, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com