जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941. 
 

दिनांक : 8 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. 

वृषभ : आज विजयादशमी आहे. हा एक अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण नवीन कार्य सुरू करू शकता. 

मिथुन : चंद्र आठव्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली व महत्त्वाची बातमी समजेल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आजचा शुभ मुहूर्त विशेष फलदायी होणार आहे. वाहन खरेदी, प्लॉट खरेदी करू शकता. 

सिंह : चंद्र सहाव्या स्थानात आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्च योग्य कामासाठी होतील. 

कन्या : अंदाज योग्य ठरणार आहेत. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक उलाढाल होऊ शकते. 

तूळ : आर्थिक आवक वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला बदल होणार आहे. विजयादशमीचा मुहूर्त चांगला ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. 

धनू : गुरू बारावा आहे. तरीसुद्धा आपणाला आज यश मिळणार आहे. व्यवसायाकडे लक्ष द्याल. 

मकर : तुमच्यासाठी आज अत्यंत दिवस चांगला आहे. आजचा मुहूर्त तुम्हाला यशदायक आहे. वेगाने प्रगती होईल. 

कुंभ : आज चंद्र बारावा आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा चंद्र प्रतिकूल आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अधिक आर्थिक लाभ होतील. 

मीन : आजचा दिवस आपल्यासाठी विशेष चांगला आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक, सार्वजनिक कार्यात यश लाभेल. 

पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 8 October 2019