जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 जुलै

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 जुलै

आजचे दिनमान 
मेष : खर्च योग्य कामासाठी होतील. मनोबलाच्या जोरावर अडचणीवर मात कराल. फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. 

वृषभ : नवीन परिचय होतील. कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात वातावरण चांगले राहणार आहे. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नुकसानीची शक्‍यता आहे. मनोरंजनाकडे कल वाढेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. 

सिंह : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. कोणत्याही प्रलोभनात अडकू नका. 

कन्या : वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सर्व गोष्टी गृहीत धरू नका. 

तूळ : कोणत्याही नवीन उपक्रमाला सुरवात करू नका. कोणत्याही क्षेत्रात धाडस नको. शासकीय कामात यश लाभेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नोकरी, व्यवसायात आस्ते कदम धोरण स्वीकारावे. थोरामोठ्यांकडून अपेक्षा नको. 

धनू : साडेसाती आहे. गुरूची अनुकूलता नाही. सतत संयमाची परीक्षा होणार आहे. मित्रांचे थोडेफार सहकार्य लाभेल. 

मकर : भागीदारी व्यवसायात चांगली स्थिती राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवणार आहे. कलेच्या क्षेत्रात काही चांगली कामगिरी करून दाखवू शकाल. यश मिळेल. 

मीन : आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. 

पंचांग
मंगळवार : आषाढ शुद्ध 8, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.06, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय दुपारी 12.28, चंद्रास्त रात्री 12.10, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ 18, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 9 July 2019