जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पंचांग 9 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941. 

दिनमान 9 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार 

मेष : प्रतिकूलता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवास होणार आहेत. अस्वस्थता संपेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी चिंता सतावेल. 

कन्या : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. 

तूळ : विरोधक व हितशत्रुंवर मात करू शकणार आहात. नोकरीतील अडचणी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

धनू : जिद्दीने व चिकाटीनी कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

मकर : स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावाल. प्रवासाचे योग येणार आहेत. 

कुंभ : कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

मीन : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. सुयश लाभेल. 

पंचांग 9 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक शुद्ध 12, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय दुपारी 4.09, चंद्रास्त पहाटे 3.50, शनिप्रदोष, तुलसी विवाहारंभ, चातुर्मास समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 18, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 9 November 2019