जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941. 

दिनांक : 9 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 
मेष : मनोबल उत्तम राहील. मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. इतरांवर प्रभाव राहील. 

वृषभ : तुमचा उत्साह विशेष असणार आहे. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

कर्क : मनस्ताप संभवतो. महत्त्वाची कामे नकोत. शांत व संयमी रहावे. 

सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. 

कन्या : काही अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. अत्यंत आनंदी व आशावादी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

धनू : महत्त्वाची आर्थिक कामे सकाळी उरकून घ्यावीत. दुपारनंतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. अनेक कामे मार्गी लावाल. 

मकर : आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायातील आर्थिक व्यवहार पार पाडू शकाल. 

कुंभ : दिवसाची सुरवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. 

मीन : काहींना निरुत्साहीपणा राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. 

पंचांग 9 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 11, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.17, चंद्रोदय दुपारी 3.46, चंद्रास्त रात्री 2.40, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर आश्‍विन 17, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 9 October 2019