महत्त्व कॉमर्स आणि आर्टसचे

artscommerce
artscommerce

वाटा करिअरच्या 

आपण आज कॉमर्स शाखा निवडीबद्दल पाहुयात. सर्वांना सामावून घेणारी अशी ही शाखा आहे. गणित उत्तम असल्यास ते घेऊन कॉमर्समधील उत्तुंग शिखरे काबीज होतात.

गणित नको असले, तरीही फार बिघडत नाही. मात्र, इयत्ता दहावीपर्यंतचे व्यावहारिक गणित मात्र कायमच वापरावे लागते. नफा, तोटा, टक्केवारी शिवाय आयुष्यात तरी यश मिळते काय? करिअर होते काय? पण कॉमर्समध्ये गणित असते, हा गैरसमज मनातून काढणे गरजेचे. 

सीए, एमबीए म्हणजेच फक्त कॉमर्स असा एक फार मोठा गैरसमज घट्ट पकडून त्यामुळे कॉमर्स नको म्हणणारे खूप. कारण, ते नाही जमले तर? बी.कॉम. करताना जेवढे विषय आपण शिकतो त्या प्रत्येक विषयातून सुरेख करिअर सुरू होते, हे निदान पालकांनी समजून घ्यावे. खास करून कॉमर्स शिक्षण न घेतलेल्या पालकांनी त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी. या शाखेत एकच गरज असते. दहावीचे मार्क टिकव, जमले तर वर्षागणिक एक टक्का वाढव आणि बहुश्रुत हो. असा पदवीधर व्यवस्थित करिअर करत जातो. 

आर्टस (किंवा ह्युमॅनिटीज हे खरे नाव) शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे दोन सरळसरळ गट पडतात. निवडीने, आवडीने, ठरवून ही शाखा घेणारे किंवा नाइलाजाने स्वीकारणारे. पहिला गट सहसा इंग्रजी माध्यम निवडतो. तर दुसरा मिळेल ते. पण दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे इंग्रजीवरचे व कॉम्प्युटर वापरावरचे प्रभुत्व पदवी दरम्यानच्या पाच वर्षांत वाढवले तर त्यांची उत्तम करिअर सुरू होऊ शकते. या शाखेची महत्त्वाची गरज असते ती सखोल अभ्यास व अवांतर वाचनाची. पुस्तक व मार्कात अडकतात ते फक्त बीए होतात. त्यांचे काय करायचे हे कोणालाच समजत नाही. आर्टस शाखेला अशांच्यामुळे कायमच दुय्यम स्थान मिळते.

माझ्या एका वाक्‍यावर फक्त वाचकांनी विचार करावा. आपले राज्य, आपला देश चालविणारे बहुतांशी आर्टस शाखेतूनच आले आहेत, एवढे समजून घेणे गरजेचे नाही काय? या दोन्ही शाखांसाठी अजून एक महत्त्वाची गरज भासते. स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात लिहिण्याची व व्यक्त करण्याची. थोडक्‍यात वाचा, लिहा आणि बोलत राहा, हे जो आत्मसात करतो तो या शाखांतून यशस्वी होतो. शाळेमध्ये दहावीपर्यंत फक्त आपण घोका आणि ओका एवढेच करतो आणि पोतभर मार्क मिळवतो. ते या अभ्यासात उपयुक्त पडत नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com