भारत-कम्बोडिया संबंध : भवितव्य परस्पर सहकार्याचं !

जगातील सर्वांत मोठा हिंदू मंदिर परिसर कोणत्या देशात आहे
India-Cambodia relations future of mutual cooperation largest Hindu temple in world
India-Cambodia relations future of mutual cooperation largest Hindu temple in worldsakal
Summary

जगातील सर्वांत मोठा हिंदू मंदिर परिसर कोणत्या देशात आहे

- देवयानी उत्तम खोब्रागडे

प्रश्नमंजूषेत विचारतात तसा एक प्रश्न वाचकांपुढे ठेवतच या लेखाची सुरुवात करावी का? जगातील सर्वांत मोठा हिंदू मंदिर परिसर कोणत्या देशात आहे? नाही हो, भारतात नाही हा परिसर.

बरं, आता दुसरा प्रश्न - कोणत्या परकीय देशातील भाषेत तीन हजारांपेक्षा अधिक संस्कृत शब्द आहेत? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे - कंबोडिया. फ्रेंचांच्या वासाहतिक सत्तेतून तो १९५३ मध्ये स्वतंत्र झाला; पण त्याहीपूर्वी एक वर्ष, म्हणजे १९५२ मध्येच आपल्या या छोट्या शेजाऱ्याला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण मान्यता दिली होती.

अर्थातच, या वर्षी (मे २०२२-२३) भारत आणि कंबोडिया आपल्यातील राजनैतिक संबंधांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. या उत्सवाची सांगता जवळ आलेली असताना मी आपणासमोर भारत-कंबोडिया संबंधांचा थोडक्यात आढावा घेऊ इच्छिते.

भारत आणि कंबोडिया यांच्यातील मैत्रीला प्रदीर्घ इतिहास आहे. आध्यात्मिक सौहार्द तसंच घट्ट सांस्कृतिक आणि सभ्यतादर्शी स्नेहबंधात ही मैत्री बांधली गेलेली आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात आज दक्षिण व्हिएतनाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारपट्टीवर भारतीय व्यापाऱ्यांचे तांडे आले. कंबोडियाच्या भूमीवर भारतीय ठसे उमटण्याची ही सुरुवात असावी.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंतच्या फुनान साम्राज्याच्या काळात कंबोडियाने शिवभक्ती स्वीकारली. नंतरच्या काळात शिवभक्तीची जागा विष्णुभक्तीने घेतली. याच काळात बौद्ध धर्मही वाढू लागला. अंकोर ही राजधानी असलेलं खमेर साम्राज्य हे एक हिंदू साम्राज्य होतं. इ.स. ९०० पासून जवळपास इ.स. १४३२ पर्यंत दक्षिण-पूर्व आशियाच्या मुख्य भूप्रदेशावरचं ते सर्वांत बलाढ्य साम्राज्य होतं.

India-Cambodia relations future of mutual cooperation largest Hindu temple in world
India Europe Relations: भारत-युरोप संबंधाची नवी दिशा!

उभय देशांमध्ये अतूट भाषिक नातंही आहे. संस्कृत आणि खमेर या भाषांत सुमारे तीन हजार शब्द सामाईक आहेत. हे भारतीय प्रभाव आत्मसात करून त्यांनी त्यांना स्वभाषिक वाक्प्रयोगांचं रूप दिलं आहे, त्यामुळे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण खमेरीकरण झालं आहे.

या ऐतिहासिक दुव्यांनी भारत आणि कंबोडिया यांच्यातील भागीदारीचा भक्कम पाया घातला आहे. पूर्वीप्रमाणेच आजही ही भागीदारी जोमाने बहरत आहे. गेल्या सत्तर वर्षांचं सिंहावलोकन करता, भारत-कंबोडिया संबंध विकासाच्या दिशेने असाधारण वेगाने आगेकूच करत आहेत. भारताकडून प्रेरणा घेत कंबोडियानेही अलिप्ततावादी चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं.

जागतिक युद्धाच्या काळातही तटस्थ राहण्याचाच कंबोडियाचा प्रयत्न होता; परंतु त्याला त्यात सक्तीने ओढलं गेलं. त्यातूनच १९७५ ते ७९ या काळात तिथं वंशसंहारक खमेर रुग राजवट आली. अखेरीस ही राजवट कोसळताच भारत हेच नव्या राजवटीला अविलंब मान्यता देणारं पहिलं राष्ट्र होतं. १९८१ मध्ये भारताने कंबोडियात पुन्हा आपली राजनैतिक कचेरी सुरू केली.

खमेर रुज पर्वानंतर कंबोडियाला जगात मित्र उरला नसताना भारतानेच त्याला वैधता प्राप्त करून दिली आणि तिथल्या नेतृत्वाच्या बळकटीला हातभार लावला. कंबोडियन सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत १९८६ मध्ये अंकोरवाट मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि संधारणासाठी आपल्या पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे तज्ज्ञांची प्रतिनियुक्ती करणारं भारत हेच पहिलं राष्ट्र ठरलं.

भारताने १९८० च्या दशकात पडद्यामागील राजनीतीत बजावलेल्या प्रमुख भूमिकेमुळे पॅरिस शांतता करार आकाराला येण्यास मदत झाली. या करारामुळे कंबोडियात प्राथमिक स्वरूपाची शांतता प्रस्थापित झाली.

India-Cambodia relations future of mutual cooperation largest Hindu temple in world
Pune Crime : IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने मॉलमध्ये मारला डल्ला; २-३ लाखाचं सोनं चोरलं

१९९१ मध्ये पॅरिस शांतता कराराला अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वी, आपलं नेतृत्व आणि कंबोडियन्स यांच्यात उच्च पातळीवर झालेल्या गांभीर्यपूर्ण चर्चेच्या आठवणी कंबोडियन नेतृत्वाने आजही मोठ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने जपल्या आहेत.

UNTAC (संक्रमण काळातील युनोची कंबोडियातील शासनव्यवस्था) द्वारा १९९३ मध्ये कंबोडियात घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या कार्यवाहीसाठी भारताने आपलं लष्करी आणि नागरी पथक पाठवलं होतं. या निवडणुकीनंतरच कंबोडियात लोकशाहीचं पर्व पुन्हा सुरू झालं.

आज भारत आणि कंबोडिया यांच्यातील संबंध अत्यंत बळकट बनलेले आहेत. उभय देशांत विविध पातळ्यांवर सातत्याने संवाद होत असतो. तेथील नेतृत्वाचं व देशाचं सक्षमीकरण, सांस्कृतिक वास्तूंचं संधारण आणि जीर्णोद्धार, सामाजिक-आर्थिक प्रकल्प, ठिकठिकाणी पेरलेल्या भूसुरुंगांची विल्हेवाट, पायाभूत विकासाच्या प्रकल्पांसाठी ऋणव्यवस्था यासाठी भारत कंबोडियाला साहाय्य करत आहे.

India-Cambodia relations future of mutual cooperation largest Hindu temple in world
PM Modi News: "नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर नरेंद्र मोदींच्या मित्राच्या मुलाकडून नरेंद्र मोदींचा फोटो भेट"

संरक्षणविषयक सहकार्यही पुरवत आहेच. ITEC (इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) या उपक्रमाखाली १९८१ पासून दोन हजारांहून अधिक कंबोडियन नागरिकांना विविध क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे.

या प्रशिक्षणात खास कंबोडियन गरजांनुसार बनवलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांचाही अंतर्भाव होता. सध्या ITEC च्या २५० जागा आणि ICCR च्या ५० शिष्यवृत्ती कंबोडियाला दिल्या गेल्या आहेत. भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे ता प्राह्म, आणि प्रा विहिअर मंदिरात जीर्णोद्धाराचं आणि संधारणाचं काम सुरू आहे.

भूसुरुंग शोधून ते निकामी करण्याच्या कामासाठी अलीकडेच भारताने ४ लाख २६ हजार डॉलर्सचं साहाय्य घोषित केलं आहे. मेकाँग - गंगा सहकार्य अनुदान साहाय्य योजनेखाली Quick Impact Projects अंतर्गत एकूण १०२.१२ दशलक्ष डॉलर्स इतक्या रकमेची ऋणव्यवस्था कंबोडियासाठी केली गेली आहे.

‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’च्या मांडणीअंतर्गतही कंबोडिया हा महत्त्वाचा आणि राजनैतिकदृष्ट्या मोक्याचा भागीदार आहे. वाढता व्यापार, गुंतवणूक, भौतिक आणि डिजिटल संपर्क, आरोग्य, पर्यटन आणि व्यक्तीव्यक्तींतील देवाण-घेवाण अशा अनेक क्षेत्रांत भारत आणि कंबोडिया यांच्या संबंधांत विकसनाची प्रचंड सुप्त क्षमता आहे.

द्विपक्षीय व्यापार नियमितपणे वाढत आहे. औषधनिर्मिती, स्वयंचलित वाहनं, खाणी आणि अन्य क्षेत्रांत भारतीय कंपन्या कंबोडियात गुंतवणूक करत आहेत. ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ जोमदार करण्याच्या आपल्या संकल्पानुसार भौतिक आणि डिजिटल संपर्क वाढवणाऱ्या प्रकल्पांसाठी भारताने आशियायी देशांना एक बिलियन डॉलर्सची ऋणव्यवस्था ( Line of Credit) देऊ केली आहे.

भारत आणि आशियाई राष्ट्रं यांच्यातील पूर्व-पश्चिम संपर्क वृद्धिंगत करू शकणाऱ्या अशा प्रकल्पांचा कंबोडिया सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत आहे. पर्यटन क्षेत्राला कंबोडिया अग्रक्रम देतं. भारत त्यादृष्टीने त्यांचा महत्त्वाचा सुप्त स्रोत आहे.

त्याचवेळी अनेक कंबोडियन नागरिकही धार्मिक (बौद्ध) आणि वैद्यकीय पर्यटनासाठी भारतात येत आहेत. म्हणूनच संपर्क, सांस्कृतिक संबंध आणि व्यापार वाढवण्यावर भारताचा भर आहे, त्यासाठी आम्हाला कंबोडियाबरोबर थेट विमानसेवा, रस्तेविषयक पायाभूत सुविधा आणि डिजिटल संपर्क या सोयी प्रस्थापित करण्यात रस आहे.

शेवटी मी इतकंच सांगू इच्छिते की, नाती ही माणसांची असतात आणि माणसंच ती निर्माण करतात. देशादेशांतील नात्यांच्या बाबतीतही हे पुरेपूर खरं आहे; आणि म्हणून भारत आणि कंबोडिया या दोन देशांच्या माणसामाणसांतील आदान-प्रदानावर आपण सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे आदान-प्रदान निश्चितच अधिकाधिक वाढू शकतं.

त्यातून दोन्ही देशांतील लोकांना परस्परांच्या प्राचीन वारशाचं भान येईल, आपसांतील दुवे समजतील आणि या दोन्ही देशांतील जनतेला वाढीव आर्थिक सहकार्याचा लाभ मिळेल. त्यासाठी मी खास करून भारतीय तरुणांना या सुंदर देशाला भेट देण्याचं प्रोत्साहक आमंत्रण देते.

इथं या आणि इथल्या सौहार्दपूर्ण माणसांत मिसळून त्यांचा परिचय करून घ्या. इथल्या भव्य आणि आकर्षक संस्कृतीची ओळख करून घ्या. आपल्यापैकी कुणालाही मग हा देश, आपल्या घरापासून दूर असलेलं आणखी एक घरच वाटेल.

या प्रदीर्घ कालावधीत खमेर राजांनी अंकोरमध्ये अनेक भव्य दगडी मंदिरं बांधली, तसंच इतरही अनेक इमारती उभारल्या. जगप्रसिद्ध असलेली अंकोरवाट, बेयों तसंच ताप्रोह्म मंदिरं वगैरे याच काळात बांधली गेली. नवल वाटावं अशा या अतिभव्य आणि विश्वविख्यात वास्तू हिंदू आणि बौद्ध धर्म, तसंच भारतीय शिल्पकलेच्या सर्वदूर पसरलेल्या प्रभावाचं दर्शन आपल्याला घडवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com