मलेशिया-भारत व्यापारात पामतेलाचा भडका

india malaysia Business
india malaysia Business

इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याला आश्रय दिल्याने २०१६ पासून भारत-मलेशिया यांच्यातील संबंधांत कटुता आली. मलेशियातून आयातीत पामतेलावरील सीमाशुल्क दरात ४५ वरून ५० टक्के वाढ करण्यात आली. 

२७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रात बोलताना मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहंमद यांनी काश्‍मीरप्रश्‍नी भारताविरोधात गरळ ओकली. पाकिस्तानशी चर्चेने काश्‍मीर प्रश्‍न सोडवावा, असे म्हटले होते. २० डिसेंबर रोजी भारतातील मुस्लिमांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने नागरिकत्वापासून वंचित ठेवले जाईल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. महातीर मुस्लिम समुदायाबाबत सातत्याने बोलत असतात. ९४ वर्षीय महातीर यांनी देशाला किंमत मोजावी लागली तरी आपण आपली भूमिका सोडणार नाही, असे ते सांगताहेत.

महातीर यांच्या विधानामुळे उभय देशांतील संबंध अधिक ताणले गेले. त्यामुळेच मलेशियातील पामतेलाच्या आयातीलाच लगाम घातला गेला. ही आयात मुक्तऐवजी बंधनयुक्त करण्यात आली. परिणामी मलेशियाच्या पामतेलाकडे भारतातील खाद्यतेल आयातदारांनी पाठ फिरवली. इंडोनेशियातून आयात वाढवली. परिणामी इंडोनेशियाच्या खालोखाल पामतेल निर्यातदार असलेल्या मलेशियातील तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. 

मलेशियाच्या एकूण निर्यातीत या तेलाचा वाटा ४.५ टक्के तर देशांतर्गत ढोबळ उत्पन्नात २.८ टक्के वाटा आहे. 

आसियान देशांत मलेशिया भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार आहे. 

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी मात्र मलेशिया किंवा तुर्कस्तानातून तेल आयातीवर निर्बंध लादले नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, नेपाळमधून भारताची पामतेलाची आयात वाढू शकते, तर बांगलादेश रास्त दरात मिळाल्यास मलेशियाचे तेल खरेदी करू शकते, अशी स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com