Indian Army Day : भारतीय सैन्याबाबत 'या' गोष्टी माहितीये का?

टीम ई-सकाळ
बुधवार, 15 जानेवारी 2020

दिल्लीत होतो कार्यक्रम

1895 मध्ये लष्कराची स्थापना

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

Indian Army Day पुणे : भारतीय सैन्य आणि जवानांमुळे आपण देशभरात मुक्तपणे फिरू शकतो, वावरू शकतो. या जवानांसाठीही एक विशिष्ट दिवस असतो, तो म्हणजे 'आर्मी डे' म्हणजेच सैन्य दिवस. हा दिवस दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे हा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

15 जानेवारी 1949 या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा दिवस "लष्कर दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याची प्रामुख्याने तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल आणि वायू दल. हे तीन विभाग देशातील नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असतात.

आर्मी डे नेमका कशापद्धतीने साजरा केला जातो. त्याचे महत्त्व काय याची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. 

ब्रिटीश भारतीय लष्कर म्हणून ओळख

भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जात असे. 

Image result for indian army

दोघांनाच फिल्ड मार्शल पदवी

लष्करप्रमुख लष्कराचे संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शलही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा मोठी असते आणि ही पदवी आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

जवानांच्या आठवणीत साजरा केला जातो 'आर्मी डे'

15 जानेवारी, 1949 पासून हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जात आहे. 15 जानेवारी, 2020 मध्ये 72 वा सैन्य दिवस म्हणून साजरा होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

दिल्लीत होतो कार्यक्रम

भारतीय सैन्याकडून हा दिवस दरवर्षी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'अमर जवान ज्योती' येथे साजरा केला जातो. तसेच सैन्याचे इतर कार्यालय आणि मुख्यालयातही हा दिवस साजरा केला जातो. 

1895 मध्ये लष्कराची स्थापना

भारतीय लष्कराची स्थापना 1 एप्रिल, 1895 रोजी करण्यात आली होती. लष्करात लाखो जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. 

Image result for indian army

राष्ट्रपती कोविंद 'कमांडर-इन-चिफ'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लष्कराचे 'कमांडर-इन-चिफ' आहेत तर लष्करप्रमुख या पदावर सध्या जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नरवणे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कर सध्या काम करत आहे.   

Image result for ramnath kovind

4 डिसेंबरला 'नेव्ही डे'

जसा आर्मी डे 15 जानेवारीला साजरा केला जातो. तशाच प्रकारे 'नेव्ही डे' हा 4 डिसेंबरला तर 'एअर फोर्स डे' 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याशिवाय 7 डिसेंबर रोजी 'आर्मड् फोर्सेस फ्लॅग डे' साजरा करण्यात येतो.

Image result for navy day

जागतिक युद्धात मोलाची कामगिरी

पहिले जागतिक युद्ध इ.स. 1914 ते 1918 या काळात झाले होते. जेव्हा जागतिक युद्ध झाले तेव्हा सैन्याची यामध्ये मोठी कामगिरी होती. 

सात कमांड्स

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13 लाख 25 हजारांहून नियमित सैनिक व 11 लाख 55 हजार राखीव सैनिक आहेत.

जगातील मोठ्या सैन्यापैकी एक

भारतीय लष्कर हे जगातील मोठ्या सैन्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून सतत स्वतःला सक्षम बनवत आहे.

Image result for indian army


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about Indian Army on Occasion of Indian Army Day