जिजाऊंच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

टीम ई-सकाळ
रविवार, 12 जानेवारी 2020

सिंदखेड येथे जन्म

जाधव घराण्याच्या कन्या

लहान वयात विवाह

शिवाजी महाराज यांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती आम्ही आपणास देत आहोत. 

सिंदखेड येथे जन्म

म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच... 

जाधव घराण्याच्या कन्या

राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील असून, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत्या. 

Image result for jijamata

लहान वयात विवाह

जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती.

जिजाऊ आदर्श माता

मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत.

Image result for jijamata

टपाल तिकीटाचे अनावरण

जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते. 

चित्रपटाची निर्मिती

राजमाता जिजाऊ यांचे कार्य पाहता त्यांच्या जीवनावर आधारित 'राजमाता जिजाऊ' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 

आठ आपत्ये

जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. 

शिवाजी महाराज यांचा जन्म

19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज.

Image result for shivaji maharaj

1674 मध्ये निधन

जिजामाता यांचे 17 जून 1674 मध्ये पाचाड येथे निधन झाले.

पुस्तके

राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे :

- जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर
- जेधे शकावली
- शिवभारत
- जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
- गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
- अग्निरेखा

चित्रपट

जिजाऊंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. चित्रपट-नाटकांत जिजामाता यांचे पात्र अनेकवेळा असतेच. 'राजमाता जिजाऊ' हा त्यांच्यावरील चित्रपट आहे तर सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information of Jijau on Occasion of her Birth Anniversary