गुप्तहेराची वेधक नोंद

छत्रपती शिवरायांचे आयुष्य शब्दांमध्ये मांडण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. शिवरायांचे कर्तृत्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे.
jayant marathe detective intriguing note Bahirji Naik Life of Chhatrapati Shivaji maharaj
jayant marathe detective intriguing note Bahirji Naik Life of Chhatrapati Shivaji maharajsakal
Summary

छत्रपती शिवरायांचे आयुष्य शब्दांमध्ये मांडण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. शिवरायांचे कर्तृत्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे.

जयंत मराठे

छत्रपती शिवरायांचे आयुष्य शब्दांमध्ये मांडण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. शिवरायांचे कर्तृत्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्यावर लिहावे असे अनेकांना वाटते. डॉ. राज जाधव यांनीदेखील शिवचरित्र लिहिण्याचा ध्यास घेतला होता.

त्यातूनच त्यांना शिवरायांचे जवळचे सहकारी त्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाचा वेध घ्यावा असे वाटले. शिवचरित्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असताना एका परदेशी प्रवाशाची नोंद वाचून त्यांना बहिर्जी नाईक यांच्यावर कादंबरी लिहावी असे नुसते वाटले नाही, तर त्यांनी तसा निर्धार केला. त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी माहिती घेतली.

अनेक ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला; मात्र किती तरी महिने शोध घेतल्यानंतरही बहिर्जी नाईक यांच्या कामाचे ठोस पुरावे त्यांना मिळू शकले नाहीत. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण बहिर्जी नाईक हे गुप्तहेर होते.

jayant marathe detective intriguing note Bahirji Naik Life of Chhatrapati Shivaji maharaj
Ajit Pawar यांनी Ramraje Naik Nimbalkar यांच्यासोबतचा 'तो' किस्सा

आपले काम कोणाला कळूच द्यायचे नाही हे गुप्तहेराचे पहिले कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचे पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत. अवघं एक पान भरेल इतकीच अधिकृत स्वरूपाची माहिती जाधव यांना मिळाली. मग मात्र त्यांनी चरित्र लिहिण्याऐवजी कादंबरी लेखनाचा प्रकार निवडला.

बहिर्जी नाईकच स्वतःच आपली कामगिरी सांगत आहेत या पद्धतीने त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. शिवरायांच्या सुरुवातीच्या काळापासून संभाजीराजांच्या कालखंडातही बहिर्जी नाईक यांनी काम केले. ‘योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोचविणे’ हा नियम त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच सोडला नाही.

jayant marathe detective intriguing note Bahirji Naik Life of Chhatrapati Shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये १४ फुट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण

चुकीची माहिती मिळाल्यामुळे छत्रपती शिवरायांची एखादी मोहीम फसली असे उदाहरण इतिहासात नाही, यातच त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते. छत्रपती शिवरायांनी आपल्या आपल्या आयुष्यात किती विलक्षण ताकदीची माणसे घडवली याची प्रचीती ही कादंबरी वाचताना येते.

छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केली त्याआधी बहिर्जी नाईक यांनी तेथे अनेक दिवस हेरगिरी करून तेथील पूर्ण माहिती काढली होती. त्यामुळे महाराजांना प्रचंड यश मिळाले. केवळ सुरतेची लूट हा एकच मुद्दा नसून स्वराज्यावर झालेले सर्वांत मोठे आक्रमण म्हणजे मिर्झाराजे जयसिंगची स्वारी. त्या काळातही बहिर्जी नाईक यांनी आपल्या कामगिरीची कमाल केली.

कादंबरीचा हा पूर्वार्ध आहे. याचा दुसरा भाग अजून येणार आहे. ६०० पेक्षा जास्त पानांच्या या पहिल्या भागात बहिर्जी नाईक यांचे बालपण ते छत्रपती संभाजीराजांचा सुरुवातीचा काळ येतो. याच्या पुढच्या भागात अजूनही अनेक गोष्टी जाधव मांडतील यात शंका नाही.

या भागात छत्रपती शिवाजी महाराजांकडून बहिर्जी नाईक यांना काय शिकायला मिळाले, तसेच राजमाता जिजाबाईंचे मार्गदर्शन कसे उपयोगी पडले याची माहिती मिळते. औषधी वनस्पती आणि उपचारांची माहिती घेतलेल्या बहिर्जी नाईक यांनी शत्रूच्या गोटात माहिती घेताना या कौशल्याचा उपयोग कसा केला तेही कळते.

बहिर्जी नाईक यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न नक्की झाला असेल; पण त्यावरही त्यांनी मात केली. शिवरायांबद्दलची प्रचंड निष्ठा आणि त्यांनी केलेले काम जाधव यांनी बारकाव्यांनिशी मांडले आहे. खरे तर फारशी कागदपत्रे उपलब्ध नसताना त्यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.

नाना कला, निरनिराळ्या विद्या, बुद्धिचातुर्य, कमालीचे प्रसंगावधान आणि तंतोतंत नियोजन या बळावर बहिर्जी नाईक यांनी महाराजांना अनेक ठिकाणची गुप्त माहिती मिळवून दिली. हा सारा घटनाक्रम जाधव यांनी केवळ ऐतिहासिक किंवा अलंकारिक भाषा वापरून मांडला आहे असे नाही, तर खरोखर त्या काळात काय घडले असेल, त्या काळची माणसे कशी वागली असतील याचा नेमका अभ्यास करून कादंबरीचा हा व्यापक पट उभा केला.

केवळ बहिर्जी नाईकच आपले कर्तृत्व सांगत आहेत असे नाही, तर छत्रपती शिवराय किंवा त्यांचे काही निकटचे सहकारी त्यांचे मनोगत मांडत असताना बहिर्जी नाईक यांच्याबद्दल त्यांना काय वाटते हे त्यांच्या मनोगताच्या माध्यमातून जाधव यांनी बहिर्जी नाईक यांचे व्यक्तिमत्त्व नेमक्या पद्धतीने कसे उलगडले जाईल याची काळजी घेतली आहे.

कोठेही रुक्षपणा न येता किंवा केवळ भाषेचा फुलोरा न मांडता घटनांना महत्त्व देत, तसेच प्रसंगाचे तपशील जास्तीत जास्त पद्धतीने मांडत ही कादंबरी पुढे सरकत जाते. वाचकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहते. हिच या कादंबरीची ताकद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com