अशी बोलते माझी कविता (जयदीप जोशी)

जयदीप जोशी, ठाणे (९८१९७९१०२३)
रविवार, 22 जानेवारी 2017

धोरण

युगे झाली, कुठे कुंपण बदलले?
बरे झाले, तुझे अंगण बदलले!

तुला समजावले, घर शांत झाले
तसे भांडायचे कारण बदलले!

कसेही साजरे करतात हल्ली
किती आहेत सगळे सण बदलले!

प्रवासाला हवे होते बरोबर
कुणी या फोनमधले क्षण बदलले?

मनाचे दार का आवाज करते?
कधी होतेस तू वंगण बदलले?

बिकट झाली कपाटाची अवस्था
रिकामे ठेवल्याने खण बदलले

त्वचेने बंड का केले असावे?
किती होतेस तू साबण बदलले!

हवेसोबत उडत डोळ्यात गेले
दगड झाले, धुळीचे कण बदलले!

धोरण

युगे झाली, कुठे कुंपण बदलले?
बरे झाले, तुझे अंगण बदलले!

तुला समजावले, घर शांत झाले
तसे भांडायचे कारण बदलले!

कसेही साजरे करतात हल्ली
किती आहेत सगळे सण बदलले!

प्रवासाला हवे होते बरोबर
कुणी या फोनमधले क्षण बदलले?

मनाचे दार का आवाज करते?
कधी होतेस तू वंगण बदलले?

बिकट झाली कपाटाची अवस्था
रिकामे ठेवल्याने खण बदलले

त्वचेने बंड का केले असावे?
किती होतेस तू साबण बदलले!

हवेसोबत उडत डोळ्यात गेले
दगड झाले, धुळीचे कण बदलले!

दिली होती तुला मी भेट पूर्वी...
तुझ्या पायातले पैंजण बदलले!

युगांचा बेत आपण आखलेला
क्षणार्धातच तुझे धोरण बदलले!

Web Title: jaydeep joshi's poem in saptarang

टॅग्स