भारतात अशी साजरी केली जाते होळी!

कृपादान आवळे
Monday, 9 March 2020

- देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते होळी याची माहिती.

भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि जैन यांसारख्या विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जाती-धर्मानुसार देशात विविध सण साजरे केले जातात. तसेच हिंदू संस्कृतीत होळी सणाला विशेष असे महत्त्व आहे. तरुण-तरुणींमध्ये होळीचा एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. होळी हा सण जरी देशातील विविध भागात साजरा केला जात असला तरी त्याची प्रथा-परंपरा वेगळी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात होळीदरम्यान शिमगा हा सण साजरा केला जातो. या भागात होळीचा सण हा जवळपास 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. तसेच उत्तर भारतातही होळी सर्वाधिक प्रमाणात साजरी केली जाते. गोकुळ, वज्र आणि वृंदावन या ठिकाणी अनेक लोक होळीचा सण पाहण्यासाठी जातात.

वज्र साजरा केली जाणारी होळी एक वेगळीच आहे. होळीच्या दिवशी पुरुषांकडून महिलेला रंग लावला जातो. उत्तराखंडमध्येही कुमाउंनी येथे पारंपारिक वस्त्रे घालून होळी साजरी केली जाते. ते करत असताना ढोल-ताशांचा वापर होतो. 

Holi esakal

शीख धर्मात होळीला विशेष असे महत्त्व आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक प्रमाणात शीख बांधव राहतात. त्यामुळे त्याठिकाणी होळीच्या एक दिवस आधी वेगवेगळे खेळ, स्पर्धा घेतल्या जातात. 

तसेच इंदूर शहरात होळी साजरी करण्याचा वेगळा प्रकार पाहायला मिळतो. या ठिकाणी होळीची एक वेगळीच शान आहे. ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी शहरातील बरेचसे लोक राजवाडा या ठिकाणी जमतात. त्यानंतर रंगीत पाण्याच्या टाक्या भरून , या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते. या होळीसाठी 15 दिवसांपासून तयारी केली जाते.

Image result for Holi esakal

दक्षिण भारतात केरळमध्येही होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या ठिकाणी होळीच्या सणाला 'मंजल कुली' असे म्हटले जाते. इथे होळी खेळण्यासाठी रंग आणि फुलांचा वापरही केला जातो. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये होळीनिमित्त जत्रेचे आयोजन केले जाते. ढोल-ताशांच्या गजरात जत्रा काढली जाते. अशा प्रकारे भारतात विविध ठिकाणी होळी साजरी केली जाते. 

Holi esakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about how holi celebrated in india