PF अकाउंटमधून पैसे काढायचेत? अशी काढता येणार रक्कम!

वृत्तसंस्था
रविवार, 15 मार्च 2020

दोन महिन्यांत काढता येणार पूर्ण रक्कम

- लग्नाचे कारण असल्यास त्वरीत रक्कम

नोकरी करत असताना बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीपोटी (पीएफ) काही रक्कम कपात केली जाते. हे पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते. जेव्हा कर्मचारी नोकरी सोडतो तेव्हा त्याला उपयोगी पडावेत म्हणून ही रक्कम साठवण्यात येते. हे पैसे काही ठराविक कारणांसाठी आपण खात्यातून कधीही काढू शकतो.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएफचे पैसे खात्यातून काढण्यासाठीचे काही नियम आहेत. आपल्या अडचणीच्या काळात तर ते जास्तच जाचक ठरु शकतात. पण काही ठराविक परिस्थितीत आपण आपल्या पीएफची सगळी रक्कम कुठल्याही अधिकच्या कागदपत्रांशिवाय काढू शकतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे असे काही नियम सर्वांना माहित असणे गरजेचे आहे.

money

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या नियमानुसार जर एखाद्याची नोकरी गेली तर एक महिन्यानंतर कुठलाही EPF खातेधारक त्याच्या खात्यातील 75 टक्के रक्कम काढू शकतो. त्यासाठी त्याला नोकरी सोडल्याचे कागदपत्रे दाखवण्याची देखील आवश्यकता नसते. एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून जर एक महिना कुठलीच रक्कम पीएफमध्ये जमा झाली नसेल तर नोकरी गेल्याचे समजले जाते. 

दोन महिन्यांत काढता येणार पूर्ण रक्कम

जर तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जास्त काळ दुसरी नोकरी मिळत नसेल तरी तुम्ही तुमच्या PF खात्यातील सर्व रक्कम काढून खाते कायमचे बंद करु शकता.

लग्नाचे कारण असल्यास त्वरीत रक्कम

जर एखादी महिला कर्मचारी लग्न करणार असेल तर अशा महिला कर्मचाऱ्यांना दोन महिने वाट पाहण्याची देखील आवश्यकता राहत नाही. त्या ताबडतोब त्यांच्या खात्यातील पैसे काढू शकतात.

marriage

58 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर...

जर का एखाद्या व्यक्तीचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती कुठल्याही क्षणी त्याच्या खात्यातील पीएफ रक्कम काढू शकते. त्यासाठी त्यांना कसलीच अडचण येणार नाही.

Old age man

वैद्यकीय उपचारासाठी तातडीने पैसे

जर तुमच्या घरात मेडिकल एमर्जंन्सी असेल आणि तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण किंवा मुलांना ताबडतोब वैद्यकीय सेवेची गरज पडणार असेल तर तुमच्या खात्यात जमा झालेला पीएफ किंवा सहा महिन्यांचा पगार या दोन्ही पैकी कमी असणारी रक्कम कर्मचारी लगेच काढून घेऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about PF Withdrawal Rules

टॅग्स