प्रेमाच्या गावा जावे (कृष्णमुरारी पहारिया)

कृष्णमुरारी पहारिया (विख्यात हिंदी कवी)
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

माझ्या मनाची बासरी...

माझ्या मनाची बासरी
नादवू नको तू
निजलेले माझे दुःख
जागवू नको तू

समजून घेउ दे मज
इतरांची गाऱ्हाणी
समदुःखी मित्रांची
मला गाउ दे गाणी
एखाद्या निद्रित स्वप्नाची
आस दावुनी

नजरेच्या भाषेत मला
गुंतवू नको तू

या घडीस मजला
गात राहु दे गान
मग आहेच पुढे
जन्मभरी विषपान
पण अता करू दे
गाण्याचे अमृतपान

उभारून बाहू
मज थांबवू नको तू

माझ्या मनाची बासरी...

माझ्या मनाची बासरी
नादवू नको तू
निजलेले माझे दुःख
जागवू नको तू

समजून घेउ दे मज
इतरांची गाऱ्हाणी
समदुःखी मित्रांची
मला गाउ दे गाणी
एखाद्या निद्रित स्वप्नाची
आस दावुनी

नजरेच्या भाषेत मला
गुंतवू नको तू

या घडीस मजला
गात राहु दे गान
मग आहेच पुढे
जन्मभरी विषपान
पण अता करू दे
गाण्याचे अमृतपान

उभारून बाहू
मज थांबवू नको तू

(‘प्रेम’ या विषयाचे विविध पैलू उलगडणाऱ्या विविध कवींच्या अनुवादित /भावानुवादित कविता या सदरातून वाचायला मिळतील.)

Web Title: krishna murari pahariya's poem in saptarang

फोटो गॅलरी