धर्मग्रंथांचं डिजिटल रूप (कृपादान आवळे)

कृपादान आवळे
रविवार, 22 एप्रिल 2018

सध्याच्या ऑनलाइन दुनियेत अनेक पुस्तकं ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होत असताना, धर्मग्रंथांचीही डिजिटल रूपं बघायला मिळत आहेत. बहुतेक सगळ्याच धर्मांशी संबंधित ग्रंथ ऍप्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सविषयी माहिती.

सध्याच्या ऑनलाइन दुनियेत अनेक पुस्तकं ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होत असताना, धर्मग्रंथांचीही डिजिटल रूपं बघायला मिळत आहेत. बहुतेक सगळ्याच धर्मांशी संबंधित ग्रंथ ऍप्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सविषयी माहिती.

सध्याच्या ऑनलाइनच्या दुनियेत वाचण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. अनेक लोक पुस्तकं ऑनलाइन स्वरूपात वाचण्याला प्राधान्य देत आहेत. आपल्याला हवी ती पुस्तकं एका क्‍लिकवर मिळतात. सध्या बहुतांश पुस्तकं ऑनलाइन स्वरूपात मिळत आहेत. यातील काही पुस्तकं मोफत असतात, तर काही विकत मिळतात. सध्याच्या युगाची गरज लक्षात घेऊन आता धार्मिक पुस्तकंही डिजिटल, ऑनलाइन स्वरूपात मिळत आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा शीख अशा सर्वच धर्मांतील अनुयायांसाठी त्यांच्या धर्मग्रंथांशी संबंधित ऍप्सही सध्या उपलब्ध आहेत.

भगवद्‌गीता इन मराठी (Bhagavad-Gita in Marathi) :
हे ऍप मराठीत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून गीता आपल्याला ऑनलाइन स्वरूपात वाचायला मिळते. या ऍपमध्ये 18 अध्यायांतले सर्व श्‍लोक देण्यात आले आहेत. या ऍपमध्ये अध्याय यादी, फेवरिट श्‍लोक, आरती, मंत्र आणि व्रत याशिवाय दैनंदिन श्‍लोक मिळवण्याबाबत नोटिफिकेशन्सचीही सोय करण्यात आली आहे. या ऍपसाठी 3.3 एमबीच्या मेमरीची गरज असून, या ऍपसाठी 4.0 आणि त्यापेक्षा अधिक अँड्राइड व्हर्जनची गरज आहे. त्यानुसार हे ऍप इन्स्टॉल करता येऊ शकते. आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे. हे एक ऑफलाइन ऍप असून, एकदा इन्स्टॉल केल्यानंतर यासाठी इंटरनेटची गरज भासत नाही.

कुराण इन हिंदी (Quran in Hindi) :
हे ऍप हिंदी भाषेत असून, ते गूगल प्ले-स्टोअरवरून इन्टॉल करता येऊ शकतं. या ऍपमध्ये कुराणाचं संपूर्ण प्रकारे वाचन करता येतं. या ऍपमध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे ऑडिओ शब्दावलीही देण्यात आली आहे. मात्र, ही शब्दावली ऐकण्यासाठी डाऊनलोड करण्याची आवश्‍यकता आहे. तसंच एखाद्या शब्दानुसार कुराणातील अध्याय शोधण्यासाठी एक विशेष असं फिचरही देण्यात आलं आहे. याशिवाय कुराणातलं एक वचन रोज एक या प्रकारे दिलं जातं. हे ऍप 40 एमबीचं असून, या ऍपसाठी 2.3 आणि त्यापुढचं अँड्राइड व्हर्जन असणं गरजेचं आहे. आतापर्यंत या ऍपचा वापर एक लाखांहून अधिक युजर्सनी केला आहे. प्ले-स्टोअरवर ते मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

द मराठी बायबल ऑफलाइन (The Marathi Bible Offline) :
"द मराठी बायबल ऑफलाइन' हे ऍप गूगल प्ले-स्टोअरवरून इन्टॉल करता येऊ शकतं. या पवित्र शास्त्राची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. या ऍपमध्ये पवित्र शास्त्रावर आधारित काही प्रश्नदेखील देण्यात आले आहेत. काही विशेष बाबींची नोंद ठेवण्यासाठी नोट्‌स हा पर्यायही देण्यात आला आहे. याशिवाय दैनंदिन वाचण्यासाठी वचनंही दिली जातात. फक्त त्यासाठी गरज आहे ती ऍक्‍टिव्हेशनची. हे ऍप 19 एमबीचं असून, पन्नास हजारांपेक्षा अधिक युजर्सनी ते इन्स्टॉल केलं आहे. यासाठी 2.3 आणि त्यापेक्षा अधिक अँड्राइड व्हर्जनची गरज आहे. गूगल प्ले-स्टोअरवरून हे ऍप मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

श्रीगुरू ग्रंथसाहिबजी (Sri Guru Granth Sahib Ji) :
हे ऍप मुख्यत: पंजाबी भाषेत असून, पंजाबीसह इंग्लिश आणि हिंदी भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून सर्व अध्याय वाचता येऊ शकतात. या ऍपमध्ये शब्दानुसार एखाद्या अध्यायाचा शोधही घेता येऊ शकतो. हे ऍप 9.9 एमबीचं असून, दहा हजारांपेक्षा अधिकांनी इन्स्टॉल केलं आहे. या ऍपसाठी 4.0.3 आणि त्यापेक्षा अधिक अँड्राइड व्हर्जनची गरज आहे.

Web Title: krupadan awle technodost article in saptarang