प्रेमाच्या गावा जावे (कुमारेंद्र पारसनाथ सिंह)

कुमारेंद्र पारसनाथ सिंह (१९२८-१९९२) (विख्यात हिंदी कवी)
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

चिमुकलं हिरवं रोप!

ती नाहतेय चमकत्या उन्हात
नदी...
चमचमतं ऊन्ह खळाळतंय
तिच्या अंगोपांगावरून...

एक परिचित सुगंध
जाणवतोय मला माझ्यासमोर
जणू काही सदेह, साकार कविताच!

हे ठिकाण, इथली धरित्री...
किती एकान्त आहे इथं...
एवढी नीरवता की
अवकाशातल्या चाहुलींमध्ये
या धरित्रीचाही कानोसा सहज घेता यावा!

आकाशाचा निळा निळा विस्तार
इथं अधिकच
आत्मरत, अंतर्मुख, गहनगहिरा वाटतोय...
शब्दाला जणू येत जावं अर्थरूप, तसा!
आणि नदी न्याहाळतेय तिचं रूप त्याच्या डोळ्यांत!

चिमुकलं हिरवं रोप!

ती नाहतेय चमकत्या उन्हात
नदी...
चमचमतं ऊन्ह खळाळतंय
तिच्या अंगोपांगावरून...

एक परिचित सुगंध
जाणवतोय मला माझ्यासमोर
जणू काही सदेह, साकार कविताच!

हे ठिकाण, इथली धरित्री...
किती एकान्त आहे इथं...
एवढी नीरवता की
अवकाशातल्या चाहुलींमध्ये
या धरित्रीचाही कानोसा सहज घेता यावा!

आकाशाचा निळा निळा विस्तार
इथं अधिकच
आत्मरत, अंतर्मुख, गहनगहिरा वाटतोय...
शब्दाला जणू येत जावं अर्थरूप, तसा!
आणि नदी न्याहाळतेय तिचं रूप त्याच्या डोळ्यांत!

आकाशाचे मौनस्वर
स्पर्शून जात आहेत
तिच्या कानांना
आणि मग ती गुणगुणू लागते
एक गाणं...
तिच्या आतलं...
खूप खूप आतलं...

एक चिमुकलं हिरवं रोप
सूर्याच्या दिशेनं हात उभारून
झेपावत चाललंय...
वर..वर...
एकसारखं!

(‘प्रेम’ या विषयाचे विविध पैलू उलगडणाऱ्या विविध कवींच्या अनुवादित /भावानुवादित कविता या सदरातून वाचायला मिळतील.)

Web Title: kumarendra parasnath singh's poem

टॅग्स
फोटो गॅलरी