कौन है ये IBS?

shyamal saradkar
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

डोकं अन्‌ पोट जागेवर अन्‌ स्वच्छ असलं की, आयुष्य सहजसुंदर अन्‌ सोप्पं वाटतं, असा कैक लोकांचा अनुभव आहे. सायकियाट्रिस्ट म्हणून लोकांशी चर्चा करताना, बोलताना, डिटेल्ड हिस्टरी घेतानाही साधारणत: पन्नास-साठ टक्के रुग्णांमध्ये कुठली न कुठली डायजेशनसंबंधित तक्रार असतेच. त्याचा संबंध सिच्युएशनल असतो.
"घाबरल्यासारखं वाटलं की, माझं पोट दुखायला लागतं.
मुरडा येतो. आतडे ओढल्यासारखे वाटतात. स्टेजवर कार्यक्रम किंवा गर्दीसमोर बोलायचं असलं की, मला लूज मोशन्स लागतातच किंवा इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री माझं पोट बिघडणार म्हणजे बिघडणारच.' असे डायलॉग आपल्या ऐकिवात असतात.

डोकं अन्‌ पोट जागेवर अन्‌ स्वच्छ असलं की, आयुष्य सहजसुंदर अन्‌ सोप्पं वाटतं, असा कैक लोकांचा अनुभव आहे. सायकियाट्रिस्ट म्हणून लोकांशी चर्चा करताना, बोलताना, डिटेल्ड हिस्टरी घेतानाही साधारणत: पन्नास-साठ टक्के रुग्णांमध्ये कुठली न कुठली डायजेशनसंबंधित तक्रार असतेच. त्याचा संबंध सिच्युएशनल असतो.
"घाबरल्यासारखं वाटलं की, माझं पोट दुखायला लागतं.
मुरडा येतो. आतडे ओढल्यासारखे वाटतात. स्टेजवर कार्यक्रम किंवा गर्दीसमोर बोलायचं असलं की, मला लूज मोशन्स लागतातच किंवा इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री माझं पोट बिघडणार म्हणजे बिघडणारच.' असे डायलॉग आपल्या ऐकिवात असतात.
मनाचा अन्‌ पोटाचा असा दोस्ताना संबंध आहे. तूम सही तो मैं सही..! "तुझं नीट चाललंय ना, मग माझा आनंद त्यातच आहे' असे डायलॉग मन आणि पोट एकमेकांना म्हणत असावेत.
मन उदास, बेचैन, स्ट्रेसफूल परिस्थिती असली की, हमखास पोटात कालवाकालव होतेच, असं निदर्शनास येतं.
IBS इरिटेबल बॉवल सिण्ड्रोम. हा असाच क्रॉनिक चिवट आयुष्य घेरून टाकणारा, पोटासंबंधित अन्‌ मनाच्या ताणतणावाच्या स्थितीतला अधूनमधून उसळी मारणारा, एक वेगळाच आयडेंटिटी असणारा, सहजासहजी निदान न होणारा, लक्षात न येणारा आजार.
बॉवल म्हणजे पोट, आतडे, इन्टेस्टाइन. सोप्या शब्दात, आतड्यांना इरिटेट झाल्यासारखं होतं आपण चिडचिडे असलो की. इरिटेबल बॉवल सिण्ड्रोम किंवा नर्व्हस कोलॉन. उदास कोलॉन. या आजाराची चांगली बाब म्हणजे, फार सिरियस, इमर्जन्सी, गंभीर परिस्थिती साधारणपणे उद्‌भवत नाही.
भारतात दर वर्षी 1 मिलियन लोक या आजाराच्या विळख्यात येतात. ताणतणाव, हरी करी वरी फास्टफूड, जंकफूडच्या इन्स्टंट ग्लोबलाइज्ड वातावरणात तरुणाईच जास्त करून याला बळी पडते आहे.
साधारणत: सतरा ते तिशीतली तरुणाई ही लक्षणं सांगताना आढळते. कधी जनरल फिजिशियनकडे, फॅमिली डॉक्‍टरकडे, तर कधी गॅस्ट्रो पोटविकारतज्ज्ञ स्पेशालिस्टकडे. डिटेल्ड, कसून हिस्टरी घेतल्यावर गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टला कंडिशनचा स्ट्रेसशी संबंध आहे, हे लक्षात येतं. मग सायकियाट्रिस्टला भेटा, असं पेशंटला सांगितलं जातं. पण, अजूनही त्याचा माझ्या मनाशी काय संबंध आहे? किंवा माझं डोकं जागेवर आहे, आय डोंट नीड टू कन्स्लट सायकियाट्रिस्ट, अशी उत्तर हायक्‍लास मॉड वेल एज्युकेटेड तरुणाई देते. हीच तर खरी आश्‍चर्याची बाब. अजूनही अव्हेअरनेस हवं तितकं नाहीच. पोटविकारतज्ज्ञ सायकियाट्रिस्ट फिजिशियन, कौन्सेलर, सायकॉलॉजिस्ट खरं तर हे टीमवर्कच आहे. चेन आहे. स्वत:ची मोटिव्हेशन अन्‌ मनापासून विश्‍वास पण हवा आपल्या थेरपिस्टवर. नाहीतर मग डॉक्‍टर शॉपिंग. डॉक्‍टर सतत बदलवत राहतो माणूस; पण आजार ठाण मांडून बसलेला असतो. लक्षणांना कंट्रोल करणं जमायला हवं.
लक्षणं : पोटात गोळा, क्रॅंप येणं. काहीतरी फिरल्यासारखं वाटणं. मुरडल्यासारखं वाटणं. गॅसेसचा त्रास.
कधी लूझ मोशन तरी कधी कॉन्स्टिपेशन म्हणजे कडक शौचास होणे. अनेमिया, रक्तस्राव, उलटी, मळमळ, सारी लक्षणं पेशंटपरत्वे बदलत असतात. पोटात जळजळ होणे, ऍसिडिटी होणे, वजन कमी होणे, निस्तेज चेहरा, पिंपल्स येणे, डोळे खोल गेल्यासारखे वाटणे, हीपण काही लक्षणं सोबतीला असतात. IBS चेहऱ्यावर जाणवतो, असं म्हणतात.
चेहरा प्रफुल्लित टवटवीत भासत नाही. कोमेजल्या फुलासारखा दिसतो. दु:खी, हारलेला.
सायकियाट्रिस्टला हेच टिपायचं असतं. चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात. न बोलता पोटापर्यंत पोचता येतं.
मुळांपर्यंत पोचूनच झाडाची, त्याच्या फांद्यांची, फळाफुलांची स्थिती लक्षात येते. मुळं खराब असली की, झाड कोमेजून जातं.
ही न दिसणारी मुळं म्हणजेच मन. त्या मनावर काम करायचं असतं. खतपाणी घालायचं असतं. हे खतपाणी घालणारी टीम म्हणजेच सायकियाट्रिस्ट, गॅस्ट्रोलॉजिस्ट, फिजिशियन, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट अन्‌ कौन्सेलर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kuon hai ye ibs