सुलेखनातून समाजप्रबोधन

subhash-jamdade
subhash-jamdade

कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी केलेला लॉकडाउनचा अनुभव सर्वांसाठीच नवीन होता. बहुतांश कामकाज बंद होते. घरात राहणे सुरक्षित असले, तरी कंटाळवाणे होते. सर्व जण टीव्ही, मोबाईल व सोशल मीडियावर वेळ घालवत होते. याच काळात संवेदनशील कलाकार म्हणून  पुण्यातील प्रसिद्ध सुलेखनकार सुभाष जमदाडे यांनी तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी ‘कोरोना ग्राफिटी’ साकारणे सुरू केले आणि समाजमाध्यमांवर रोज एक पोस्टर जवळपास तीन महिने प्रसारित केले. मार्मिक शब्दरचना, सुलेखन अक्षरशैली व समर्पक डिझाइनमुळे या ग्राफिटीचे जाणकारांपासून ते सर्वसामान्यांनीही कौतुक केले आहे.  

या ग्राफिटींमध्ये फक्त संदेश किंवा उपदेश नव्हता, तर लॉकडाउन काळातील घडामोडी, मानसिक अवस्था, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक बदलांमुळे झालेली परिस्थिती, या सर्व विषयांवर जमदाडे यांनी मार्मिक टिप्पणी केली. कधी चिमटे, कधी गुदगुल्या, कधी विनोद, कधी वास्तव, कधी व्यथा अशा विविधांगी लेखनशैलीतून सुभाष जमदाडे यांनी रसिकाश्रय कमावला. 

जमदाडे कमर्शिअल आर्टिस्ट, कॅलिग्राफर, टाइप डिझायनर व ग्राफिक डिझायनर म्हणून गेल्या २५ वर्षांपासून जाहिरात, कला, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक माध्यमांसाठी काम करत आहेत. हँडरायटिंगपासून ते कॅलिग्राफीपर्यंत, लेटरिंगपासून लोगोपर्यंत, पोस्टरपासून पेंटिंगपर्यंत आणि टायटलपासून टाईपडिझाइनपर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारची अक्षरकलाकृती ते साकारतात. त्यांच्या अनेक कलाकृतींना राज्य पुरस्कार मिळाले व जाहिरात डिझाइन स्पर्धांमधूनही अनेक पुरस्कार कमावले आहेत. जमदाडे यांना लेखनाचीही आवड आहे. अधूनमधून ते त्यांच्या शब्दांतील शुभेच्छा, संदेश, कविता सुलेखनाद्वारे समाजमाध्यमांवर शेअर करून व्यक्त होत असतात. संगणकावर वापरल्या जाणाऱ्या श्रीलिपी व सी-डॅक यांच्या सॉफ्टवेअरमधील देवनागरी व इतर लिपीतील शेकडो शैलीदार फॉण्ट व कॅलिग्राफिक क्‍लिपआर्ट जमदाडे यांनी डिझाइन केले आहेत. त्यांच्या सुलेखनातील आविष्काराची व अक्षरचित्रांची अनेक प्रदर्शने पुणे, मुंबई येथील कलादालनांत भरली आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके त्यांच्या नावावर असून, सुलेखनावर आधारित पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाउन काळात त्यांची प्रत्येकच ग्राफिटी लक्षवेधी आहे. त्यात ‘विनाकारण घराबाहेर जाणं म्हणजे ‘कोरोना पाहुण्याला’ स्टॅण्डवरून घरी आणायला जाण्यासारखं आहे... म्हणून घरातच बसा सुरक्षित असा’, ‘कोरोना चायनीज असल्यामुळे त्याला हाकलण्यासाठी दिलेल्या मराठी शिव्या त्याला कळत नाहीत... फक्त मराठी भाषेचा उद्धार होतो!’, ‘मध्येमध्ये नाक खुपसायची व तोंड घालण्याची सवय ‘मास्कमुळे’ कमी होऊ शकते... शिवाय कोरोनापासून सुरक्षा!’ अशा अनेक ग्राफिटी समाजमनाचा वेध घेऊन प्रबोधन करणाऱ्याही आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com