"डोक ला' आणि भारत - चीन प्रश्न...

मेजर जनरल (निवृत्त) संजय भिडे
मंगळवार, 11 जुलै 2017

सध्याच्या परिस्थितीत चीनकडे सिक्कीममध्ये आक्रमण करण्यासाठी नथुलाचा पर्याय आहे. सिक्कीमच्या उत्तरेकडूनसुद्धा आक्रमण होऊ शकते पण कठीण प्रदेश आणि रस्ता नसल्याने तो पर्याय अवघड आहे. नथुलापर्यंतसुध्दा सोपा नाही कारण इथे रस्ता येणाऱ्यांवर रस्त्यांवर आपण सहज लक्ष्य ठेऊ शकतो

चीनच्या सैन्याने डोकलाच्या या परिसरामध्ये आपले बंकर तोडले आणि दोन्ही सैन्य समोरासमोर येऊन तणाव झाल्याचे वृत्त आपण वाचतो आहे. चीनने नथुलाच्या वाटेने जाणारी कैलास यात्रापण थांबविली. काय आहे प्रकरण?

भारत चीनमधील सीमाप्रश्‍नापेक्षा हे वेगळे प्रकरण आहे. यामध्ये भूतान पण सामील आहे आणि भूतानची यावर काहीच प्रतिक्रिया नाही. 

डोकालाम पलतेऊ हा भाग चीनच्या चुंबी व्हॅलीच्या दक्षिणेला आहे. हा भाग भूतान, चीन आणि भारताची सीमा आहे त्याच्या दक्षिणेला आहे. ज्या पॉइंटला तिन्ही देशांच्या सीमा मिळतात त्या पॉइंटला "त्री जंशन' म्हणतात. डोकाला पास हा त्या पॉइंटच्या दक्षिणेला साधारण 900 मीटर दूरीवर आहे म्हणजे हा पास आपल्या आणि भूतानच्या सीमेवर आहे.

सीमावाद
खरतर इथला मुख्य वाद हा चीन आणि भूतानमधील आहे कारण चीन डोकाला प्लाटून हा भूतानचा भाग त्यांचा असल्याचा दावा करतो आहे.भारत या प्रकरणात येतो कारण भारत - भूतान संधी अंतर्गत भूतानच्या संरक्षणाची हमी भारत घेतो. दुसरा मुद्दा म्हणजे जर डोकलाम पठार चीनकडे गेला तर जो आत्तापर्यंत तरी जंक्शन पॉइंट आहे तोपण दक्षिणेकडे शिफ्ट होईल आणि असे करायला भारताची संमती हवी.

चीनच्या दाव्याचा अजून एक घटक आहे; तो असा चीन आणि सिक्कीमची सीमा सेटल आहे आणि त्या सीमेची सुरवात डोका ला साधारण 300 मीटर आहे. सिक्कीम भारतात विलीन झाल्यावर चीनच्या दाव्याप्रमाणे हीच सीमा आहे आणि ती त्री जन्शनसुध्दा दक्षिणेकडे शिफ्ट आहे. पठारावर बर्फ नसताना काही वेळा चीनचे सैन्याच्या तुकड्या येतात आणि आपल्या डोकालावर असलेल्या तुकड्यांना मागे जाण्यास सांगतात. इथे तर रस्तापण तयार करत आहेत. खरेतर हे भूतानच्या भूमीवर चालले आहे पण असे झाले की आपण आक्षेप घेतो आणि स्थिती काही दिवसांनी मावळते.

भूतान सरकारने आजपर्यंत अशा चिनी सैन्याच्या कारवाईचा कधीच निषेध केला नाही. यावेळी मात्र त्यांनी आपले बंकर तोडल्याचे वृत्त आहे. आता जेव्हा आपण इक्का पासवर बंकर तयार करतो तेव्हा एक दोन बंकर पुढील उतारावर पण असतात मात्र यामध्ये पूर्वेकडे भूतानच्या बाजूला. तिथे आपले सैनिक कायमस्वरूपी नसतात.

भारत मध्ये का?
एक तर आधी स्पष्ट केल्याप्रमाणे भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपल्या दोन्ही देशांना मधले संबंध या गोष्टीवर जपले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आहे तो सिक्किमच्या सुरक्षिततेचा. सध्याच्या परिस्थितीत चीनकडे सिक्कीममध्ये आक्रमण करण्यासाठी नथुलाचा पर्याय आहे. सिक्कीमच्या उत्तरेकडूनसुद्धा आक्रमण होऊ शकते पण कठीण प्रदेश आणि रस्ता नसल्याने तो पर्याय अवघड आहे. नथुलापर्यंतसुध्दा सोपा नाही कारण इथे रस्ता येणाऱ्यांवर रस्त्यांवर आपण सहज लक्ष्य ठेऊ शकतो. त्यामुळे जर डोकालापर्यंतचा भाग चीनकडे गेला तर ते तिथपर्यंत रस्ता तयार करून नथुलाचे संरक्षण करू शकतात आणि इकडून नथुला पर्वतराशीच्या पश्‍चिमेला उतरु शकतात. बरीच वर्षे चीनचा हा पर्याय आहे आणि त्यासाठी भूतानच्या सीमेच्याजवळून त्यांनी याडोंग - चुंबी खोऱ्यामधील एक सथानपर्यंत रस्ता बांधला आहे आणि इथून पुढे पठारापर्यंत आता करीत आहेत.

पुढे काय?
आजपर्यंत आपण भूतानला या प्रश्‍नातून दूर ठेवले आहे. मित्र राष्ट्र असल्यामुळे आता भूताननेसुध्दा चीनच्या अशा कारवाईचा निषेध केला पाहिजे. भूतान सरकारला आपल्या सिक्किमच्या संरक्षणाची काळजी सांभाळली पाहिजे आणि डोकलाम पठार चीनला देण्यात भारताचे हित नाही हे स्पष्ट करणे जरुरीचे आहे. इतकी वर्ष हा प्रश्‍न भूतान नरेश बघत होते. नरेशना भूतानमध्ये खूप आदराने बघतात पण लोकशाही सरकार आल्यानंतर भूतान नरेशांचे हात थोडे बांधले गेले. त्यामुळे भूतान सरकारशी या विषयावर चर्चा जरुरी आहे.

Web Title: Major General Sanjay Bhide writes about India-China conflict