अशी बोलते माझी कविता (मनीषा वाणी)

मनीषा वाणी, सुरत (गुजरात) ९४२६८१०१०९
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

...कंठ येतो दाटून !

बरं झालं देवा, दिली एक कन्या
तिच्यामुळं मला कळली ही दुनिया

तुरूतुरू चालताना बोलायचे पैंजण
शोभा आली घरा, तिनं फुलवलं अंगण

बोबडे तिचे बोल, तिचे केस भुरूभुरू
बाबा आनंदून म्हणती, किती लाड करू?

वाढू लागली लेक, झाली माझी आई!
काढू लागली चुका...म्हणे ‘तुला कळत नाही’!

घरभर फिरत असते, खूप तिची बडबड
‘मदत करते तुला’ म्हणत करते किती गडबड!

येता-जाता घरात मला मारत असते मिठी
सदान्‌कदा नाव तिचेच माझ्यासुद्धा ओठी

...कंठ येतो दाटून !

बरं झालं देवा, दिली एक कन्या
तिच्यामुळं मला कळली ही दुनिया

तुरूतुरू चालताना बोलायचे पैंजण
शोभा आली घरा, तिनं फुलवलं अंगण

बोबडे तिचे बोल, तिचे केस भुरूभुरू
बाबा आनंदून म्हणती, किती लाड करू?

वाढू लागली लेक, झाली माझी आई!
काढू लागली चुका...म्हणे ‘तुला कळत नाही’!

घरभर फिरत असते, खूप तिची बडबड
‘मदत करते तुला’ म्हणत करते किती गडबड!

येता-जाता घरात मला मारत असते मिठी
सदान्‌कदा नाव तिचेच माझ्यासुद्धा ओठी

खरंच का ही लेक कधी जाईल मला सोडून?
नुसत्या विचारानंसुद्धा कंठ येतो दाटून !

Web Title: manisha wani's poem

टॅग्स
फोटो गॅलरी