

Nostalgia and the Revival of Letter Writing
Sakal
गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com
परवा माझ्या एका लहानग्या मित्राने मला दिवाळीत पत्र पाठवलं. ई - मेलवरनं जरी पाठवलं असलं, तरी मजकुराचा घाट मात्र शाळेत शिकवलेल्या पत्राचाच होता. मायना, मजकूर अन् शेवट! पत्रलेखन नामे विस्मरणात गेलेल्या लोकव्यवहाराची आठवण जागवून या पत्रानं रमवलं वेळ, पण त्याच बरोबर मायेची पत्रं लिहिणारे बरेच जण सोडून गेले, ही जाणीव व्याकूळ करून गेली. मग त्या आपल्या गमावलेल्या माणसांच्या आठवणींनी सैरभैर होणं ओघानं आलंच.