तुम्ही कधी 'व्हर्च्युअल फ्रेंडशिप' केली आहे?

Representational Image
Representational Image

आपलं जीवन अतिशय धावपळीचं झाले आहे. वेळही कमी पडू लागला आहे. त्यातच वेळेत वेळ काढून नातीगोती सांभाळावी लागतात. काही नाती माणसाच्या जन्माबरोबरच येतात व त्याच्या मृत्यूबरोबरच संपतात. काही नाती जुळवली जातात, तर काही आपोआपच जुळतात. रक्ताचं नातं सोडून इतर अनेक व्यक्तींशी नातं निर्माण होत असतं. कधी ते आयुष्यभरासाठी घट्ट होतं, तर कधी मनाच्या कोपऱ्यात राहतं आणि कधी अचानक तुटूनही जातं. 

नातं रक्ताचं असो वा जुळलेलं असो, नातं माणसांना लळा लावतं. म्हणूनच नातं आणि नातेवाइकांचं स्थान माणसाच्या जीवनात आवश्‍यक व महत्त्वपूर्ण आहे.

सध्याचं युग इंटरनेटचं आहे. अनेक जण तासन्‌तास संगणकावर काम करत असतात. अनेक जण कामानिमित्त परदेशात जात असतात. काम संपलं की परत आपल्या देशात परततात. तेथे आपल्या ओळखी होतात. पुढे त्या दृढ होत जातात. हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि मैत्रीचं रूपांतर नात्यात कधी होतं हे समजतही नाही. प्रत्यक्ष एकमेकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे अनेक जण इंटरनेट आणि मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहतात. मोबाईल-इंटरनेटमुळे अनेक नाती निर्माण झाली आहेत. काही नाती अशी निर्माण होतात, की आपण प्रत्यक्षात त्यांना कधी भेटलेलो नसतो. भेट होईल की नाही, हे माहीतही नसतं; परंतु त्या व्यक्तीचं आणि आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं. हे नातंही रक्ताच्या नात्याइतकंच महत्त्वाचं वाटू लागतं. माझ्याबाबतीतही असंच घडलं.

सात वर्षांपूर्वी कॅनडामधील एका मुलीशी इंटरनेटद्वारे मैत्री झाली. रोज एकमेकांबरोबर संवाद साधू लागलो. मेल करू लागलो. गेल्या सात वर्षांत आमच्यात एक चांगलं नातं निर्माण झालं. आम्ही कधी एकमेकांना भेटलेलो नाही. कधी भेटू की नाही, हेही माहीत नाही. नुसती तिच्याबरोबरच ओळख झाली असं नाही, तर तिच्या घरच्यांबरोबरही ओळख झाली. तिच्यासह घरातील व्यक्तींशीही बोलू लागलो. त्यांनाही भारताबद्दल आदर आहे. त्यांना आपली संस्कृती आवडते. आपल्याकडील सण-समारंभ आठवणीत ठेवून शुभेच्छा देत असतात. घरच्यांबद्दलही आपुलकीनं विचारपूस करतात. 
भारतातील अनेक वृत्तपत्रांच्या वेबसाईटना भेट देऊन माहिती मिळवून त्याबद्दल मलाही विचारत असतात. दोघांनाही एकमेकांच्या नातेवाइकांची माहिती झाली आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांबद्दल विचारपूस करत असतो. अनेक विषयांवर माहिती करून घेत असतो. एकमेकांच्या देशातील हवामानासह विविध विषयांवर चर्चा करतो. माहितीची देवाण-घेवाण करत असतो. आमचा देश, भाषा, जात, वर्ण वेगवेगळा, तरीही चांगलं नातं तयार झालं आहे. दोघंही आपापल्या कामात मग्न असतो. पूर्वी चॅटिंगद्वारे एकमेकांना भेटत असायचो. सध्या कामामुळे भेट होत नसली तरी एकमेकांना मेल येत असतात. त्यातूनच माहिती मिळत राहते. हे नातं रक्ताच्या नात्यापलीकडलं असलं तरी ते घट्ट झालं आहे. एकमेकांबद्दल माहिती नसतानाही ओळख झाली व त्यातूनच हे नातं निर्माण झालं.

बोलूया...'व्हर्च्युअल' जगातल्या सच्च्या मैत्रीबद्दल !

मैत्रीचं नातं सुंदर. जीवाभावाचं.
सुख-दुःखं शेअर करण्याचं.
जगणं समृद्ध करणारं.
हे नातं राहतं आयुष्यभर.

 

गेल्या दीड दशकांत या नात्याला मिळालाय नवा आयाम. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशिप'चा.

सोशल नेटवर्किंग वेबसाईटस् किंवा चॅटिंग अॅप्लिकेशन्सवर कुणाशी तरी मैत्री जडते. तो मित्र किंवा ती मैत्रीण कधीच प्रत्यक्ष पाहिलेली नसते. अंतरंही खूप दूरदूरची. पण, मैत्र जुळतं. अनुभवाची देवाण-घेवाण होते. सुख-दुःखं वाटली जातात. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशीप' रोजच्या जगण्याचा भाग बनून जाते.

यंदाचा मैत्र दिन आहे सहा ऑगस्टला. ही संधी घेऊया आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्डस्'बद्दल बोलण्याची.

आम्हाला पाठवा आपला अनुभव. लिहा आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'ने आपल्या आयुष्य कसं समृद्ध बनवलं...आपल्यात काय बदल घडवले...

आपले अनुभव शेअर करण्यासाठी:

  • ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject मध्ये लिहा Friendship
  • किंवा
  • facebook.com/SakalNews वर मेसेज पाठवा
  • किंवा
  • Sakal Samvad अॅप डाऊनलोड करा आणि सविस्तर लेख पाठवा
  • प्रतिक्रियेमध्ये सविस्तर लिहा

'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दल लिहिताना हे करा:

  • युनिकोड-मराठीमध्ये आपला लेख असू द्या.
  • आपले नाव आणि पत्ता लेखाच्या शेवटी हवा. निनावी लेख प्रसिद्ध होणार नाहीत.
  • लेखाचा उद्देश सकारात्मक मैत्रीचा आहे, हे लक्षात असू द्या.
  • मैत्रीत शब्दमर्यादा नसते. तेव्हा ती काळजी नको.
  • चला तर मग, 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com