Menstrual Hygiene Day : ते पाच दिवसही रोजच्यासारखेच!

मंगळवार, 28 मे 2019

आजही 'मासिक पाळी' हे दोन शब्द थोड्या मोठ्या आवाजात ऐकू आले, तरी अजूनही ऐकणारे दचकतात.. 'मासिक पाळी' म्हणजे जणू काही कानगोष्टी करण्यासारखा विषय आहे, असा समज करून घेत वर्षानुवर्षं आपण यावरील चर्चेला वाळीत टाकत आलो आहोत.

अगं ऐक, आज तुझ्या माझ्यासाठी चांगला दिवस आहे. का? आज मेन्स्ट्रुअल हायजिन डे आहे. आजच्या दिवशी सारं जग थोड्या फार प्रमाणात का होईना पण मोकळेपणाने मासिक पाळी या विषयावर चर्चा करतात आणि मासिक पाळी दरम्यान आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. 

आजही 'मासिक पाळी' हे दोन शब्द थोड्या मोठ्या आवाजात ऐकू आले, तरी अजूनही ऐकणारे दचकतात.. 'मासिक पाळी' म्हणजे जणू काही कानगोष्टी करण्यासारखा विषय आहे, असा समज करून घेत वर्षानुवर्षं आपण यावरील चर्चेला वाळीत टाकत आलो आहोत. हे केवळ भारतातच होतं, असं नाही. ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक सर्वेक्षण समोर आलं होतं. तेथील दर पाचपैकी एका मुलीला तिच्या मासिक पाळीवरून मानसिक छळाला सामोरं जावं लागलं आहे, असं त्या सर्वेक्षणातून दिसून आलं. 

त्या सर्वेक्षणातील काही आकडे धक्कादायक होते. 'मासिक पाळी सुरू असताना शाळेत छळ झाला', असे तब्बल ६७ टक्के मुलींनी सांगितलं; तर ६६ टक्के मुली म्हणाल्या, की या कालावधीत त्यांनी शाळेत न जाणंच पसंत केलं. ही परिस्थिती ब्रिटनमधली आहे; भारतातील नाही.

अशा प्रकारची वागणूक मिळण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे मुलांना त्यांचे पालक यासंदर्भात पुरेशा मोकळेपणाने माहिती देत नाहीत आणि मुलींचे पालक दबक्या आवाजात चर्चा करण्यातच धन्यता मानतात.

Image result for menstrual hygiene day images

डॉ. रॅचेल पोलिस यांनी काही दिवसांपूर्वी 'फिलिव्हॉईस' या संकेतस्थळावर एक लेख लिहिला होता. 'तुमच्या मुलीला तिच्या पहिल्या पाळीसाठी तयार कसं कराल' असा त्या लेखाचा विषय होता. 

त्यांच्या लेखानुसार,

- पौगंडावस्थेत शरीरामध्ये होणारे बदल आणि त्याविषयी मुलींना माहिती देणं वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून सुरु केलं, तर चुकीच्या माहितीच्या अधीन जाणे टाळता येते.
- 'तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणींमध्ये हे बदल होणारच आहेत; पण कदाचित एकाच वेळी होणार नाहीत. प्रत्येकामध्ये हे बदल होण्याचा नैसर्गिक कालावधी वेगळा आहे', हे समजावून सांगा. यातून उगाच इतरांशी तुलना करून होणारा मानसिक त्रास वाचू शकेल.
- या सगळ्या चर्चेमागील मूळ हेतू लक्षात ठेवा : मासिक पाळी सुरू होईल, तेव्हा 'हे काय होतंय' अशा विचारानं मुलगी बावरून जाऊ नये. त्यापूर्वीच तिला या गोष्टी ठाऊक करून द्यायला हव्या.

यासंदर्भात काम करणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्ती भारतामध्येही आहेत. 'युअरस्टोरी' या संकेतस्थळाने प्राची कौशिक यांच्या 'व्योमिनी' या उपक्रमावर लेख प्रसिद्ध केला आहे. कौशिक यांनी २०१६ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देत ग्रामीण भारतामध्ये महिला उद्योजकांना बळ देण्यासाठी काम सुरू केले. याच उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी आणि त्या काळातील स्वच्छता याबाबत जनजागृती करणे.

ग्रामीण भारतासह शहरांमध्येही कंपन्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्ससाठी व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देणे आणि कंपनीच्या व्यवस्थापनालाही मासिक पाळीतील आरोग्याविषयी बहुमोल माहिती देणे असे काम त्यांची संस्था करते. याशिवाय, ग्रामीण भागातच दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन्स बनविण्यावरही त्यांनी भर दिला आहे. २०२० पर्यंत एक लाख गावांमध्ये हा उपक्रम पोचविण्याची कौशिक यांची महत्त्वाकांक्षा आहे.

Prachi Kaushik, Vyomini

आपल्याला 'मेन्स्ट्रुअल हायजिन डे'ची गरज का आहे? 
- ग्रामीण भागात प्रोलिफिक शेमिंगला घाबरुन अजूनही बऱ्याच महिला मासिक पाळी दरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.  
- सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पॉन्स यांसारखे मासिकपाळीमध्ये वापरले जाणाऱ्या साहित्य न मिळाल्याने अनेक स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
- याच कारणाणमुळे आजचा दिवस मासिक पाळीचे ते पाच दिवसही इतर दिवसांसारखेच असल्याचे ठासून सांगतो. आजचा दिवस मासिक पाळीबद्दल फक्त महिलाच नाही तर पुरुषांमध्येही जागरुकता निर्माण करण्यासाठी असतो. मासिक पाळीसंदर्भात कमी माहिती असल्यानेच मेन्स्ट्रुअल हायजिनमध्ये तडजोड केली जाते. आजचा दिवस मासिक पाळीबद्दल जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवतो जेणेकरुन मासिक पाळीकडे एक डाग म्हणून बघणे कमी होऊ शकते.  

'मेन्स्ट्रुअल हायजिन डे'चे उद्दिष्ट -
जगातील प्रत्येक महिला कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता यायला हवी. त्यामुळेच यंदाच्या मेन्स्ट्रुअल हायजिन डेची थिम #ItsTimeForAction अशी आहे. तर चला उठा आणि किमान आपले मित्र, आफिसमधील सहकरी यांच्याशी तरी मासिक पाळीबद्दल न घाबरता, न लाजता बोलायला सुरवात करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Menstrual Hygiene Day special Article