अबब... 3 कोटी रुपयांचा शूज? काय आहे यात खास!

अबब... 3 कोटी रुपयांचा शूज? काय आहे यात खास!

कोऱ्या करकरीत चपलांची पायात घालण्याची मजाही काही और असते. ब्रॅंडेड आणि नव्या फॅशनच्या चपलांच्या किमतीही "भारी'च असतात. नव्या वहणा घरी आल्या की जुन्या बाद होतात. पण जुन्यांनाही "मोल' असते हे सूदबे या संस्थेने नुकत्याच केलेल्या लिलावात दिसले. या लिलावात जुन्या बुटांचा एक जोड तब्बल तीन कोटी सहा लाख रुपयांना विकला गेला. आतापर्यंत लिलावात विकल्या गेलेल्या बुटांच्या किमतीचा विक्रम या बुटांनी मोडला आहे. 

जगप्रसिद्ध नायके कंपनीच्या या बुटांसाठी कॅनडातील गुंतवणूकदार कंपनी "पीरेज कॅपिटल'चे संस्थापक माइल्स नडाल यांनी लिलावात चार लाख 37 लाख 500 (सुमारे 3.6 कोटी रुपये) डॉलरची बोली लावली होती. त्या वेळी तेथे उपस्थि सर्व जण आश्‍चर्यचकीत झाले होते. नडाल यांनी या बुटांशिवाय दुर्मीळ असे आणखी 99 बुटांचे जोडही खरेदी केले. यासाठी त्यांनी 5. 86 कोटी रुपयांची बोली लावल्याचे सांगण्यात आले. प्रचंड बोली लावून बूट विकत घेतल्याचा आनंद नडाल यांनी व्यक्त केला. "क्रीडा इतिहासाचे जतन यामुळे करता आला,'अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

बुटाचे वैशिष्ट्य 

- जागतिक ब्रॅंड असलेल्या "नायके'ने ते 1972 मध्ये तयार केले होते. 
- "नायके'चे सहसंस्थापक बिल बोवरमॅन यांनी त्याचे डिझाइन केले होते. 
- हे बूट "मून शूज' नावाने ओळखले जातात. 
- ऑलिंपिकच्या चाचणीसाठी 47 वर्षांपूर्वी त्याचे उत्पादन केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com