Mother's Day : आई म्हणजे सर्वांत सुंदर गिफ्ट!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

"स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत. 

मदर्स डे : "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत. 

गायत्री दातार (तुला पाहते रे) : गार्गीताईसोबत काम करणं म्हणजे धमाल. ती एक कमालीची अभिनेत्री आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकतेय. ती ज्या सहजतेने अभिनय करते तसंच तिचं भाषेवरचं प्रभुत्व हे सगळं वाखाणण्याजोगं आहे. माझ्या आईसोबत माझं घट्ट बॉंडिंग आहे. ती मला प्रोत्साहन देते; पण आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही. 

gayatri
 

ईशा केसकर (माझ्या नवऱ्याची बायको) : किशोरीताई ही माझ्या आईसारखीच आहे. आमचं आई-मुलीचं नातं ऑफस्क्रीनही घट्ट आहे. गमतीची गोष्ट म्हणजे किशोरीताई ही माझी पहिलीच ऑनस्क्रीन मम्मा आहे. दरम्यान, माझी आई माझ्या मैत्रिणीसारखी आहे. जिच्यासोबत मी सर्व काही शेअर करते. मी भाग्यवान आहे की खऱ्या आयुष्यासारखी मला छोट्या पडद्यावरही एक सुपरकुल मम्मा मिळाली आहे. 

isha

शुभांगी अत्रे (भाबीजी घर पर है) : आई बनणे हे मला मिळालेले सर्वांत सुंदर गिफ्ट आहे. मी माझ्यामध्ये असलेल्या आईचा आत्मविश्‍वास व उत्साहाचे श्रेय माझ्या आईला देते. तिने दिलेल्या चांगल्या शिकवणीमुळेच मी माझ्या मुलीसाठी एक चांगली आई व व्यक्‍ती बनली आहे. जीवनात कितीही चढ-उतार असो; आपण नेहमी विनम्र राहण्याची शिकवण आईने दिली आहे. 

shubhangi

ईशिता गांगुली (विक्रम बेताल की रहस्यगाथा) : माझ्या जीवनातील सर्वांत मोठे गिफ्ट म्हणजे माझी आई. ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे सांगण्यासाठी कोणतेच गिफ्ट पुरेसे नाही. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाला आम्ही सरप्राईज पार्टी दिली होती आणि मी तिला टेम्पल ज्वेलरीचा सेट भेट दिला होता. आईने मला प्रत्येक परिस्थितीत संयम व सक्षम राहण्याचा सल्ला दिला आहे. 

ishita

अविनाश सचदेव (मैं भी अर्धांगिनी) : मी एकुलता मुलगा असल्यामुळे आई माझ्यासाठी आईपेक्षाही बरेच काही आहे. ती माझी मैत्रीण, समर्थक राहिली आहे आणि तिने मी केलेल्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिला आहे. तिने मला माझे करिअर व जीवनात घेतलेल्या निर्णयांना नेहमीच पाठिंबा दिला. मला मुंबईला जायचे असतानादेखील ती माझ्यासोबत होती. मी माझ्या यशाचे श्रेय तिला देतो.

avinash

अनुष्का सेन (खूब लडी मर्दानी झांसी की राणी) : एक आई तिच्या बाळासाठी जे करते ते इतर कोणीही करू शकत नाही. काही वर्षांपासून मी मातृदिनी हाताने एक कार्ड बनवते आणि त्यावर आईची आणि माझी काही चित्रे चिकटविते. यातून आठवणींना उजाळा मिळतो. आई बनणे हे जगातील सर्वांत कठीण काम आहे. तिला मुलांसाठी त्याग अन्‌ तडजोडी कराव्या लागतात. 

anushka

दीपिका सिंग (कवच 2) : मला माझ्या जीवनात दोन महत्त्वाच्या स्त्रिया नशिबाने चांगल्या मिळाल्या आहेत; एक माझी आई आणि दुसरी सासू. आई ही माझी उत्कृष्ट फॅशन ट्यूटर आहे, ती नेहमी मला चांगले दिसण्यात मदत करते आणि माझे पोशाख डिझाईन करते. माझी सासूही माझी सर्वांत मोठी सहायक आहे; कारण ती माझ्या मुलाची काळजी घेते आणि मला मुलीसारखे वागवते. 

deepika
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mothers Day celebration of actors