esakal | रुद्राक्षमहिमा
sakal

बोलून बातमी शोधा

Rudraksh

रुद्राक्षमहिमा

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

रुद्राक्षाला आध्यात्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. पुराणामध्येही त्याचे वर्णन आहे. अनेक जणांना त्याचे आकर्षण असते. रुद्राक्ष वापरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातही काही बदल घडत असतात अशी धारणा आहे. त्याविषयी…

१) शिवमहापुराण, श्री गुरुचरित्रामध्ये रुद्राक्षाला प्रत्यक्ष शिव स्वरूप रूप मानले गेलेले असून, हा रुद्राक्ष मिळण्यास दुर्मिळ व अत्यंत कल्याणकारी समजला जातो. २) कुंडलीनुसार रुद्राक्ष वापरले असता व्यक्तीच्या सर्व मनोवांछित इच्छा आणि कामनापूर्ती करणारा समजला जातो. जी व्यक्ती हा रुद्राक्ष धारण करते तिच्या सर्व इच्छा पूर्णत्वाला जातात. ३) रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती ब्रह्महत्या व गोहत्येच्या पापातून मुक्त होते. (शिवमहापुराण) ४) रुद्राक्षाला चंद्रदेवांचा प्रत्यक्ष आशीर्वाद आणि चंद्रदेवांचे तत्त्व प्राप्त झाल्यामुळे हा रुद्राक्ष मनाला शीतलता, शांतता आणि स्थैर्य प्रदान करतो. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्याच्या मनाला चंद्रासारखी शीतलता प्राप्त होऊन त्याचे मन सदैव प्रसन्न राहते. अंतर्मनाला ऊर्जा देणारा, सदैव पित्ताला शांत ठेवणारा आणि शरीर व मनाचा समतोल ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायी असे रुद्राक्ष सर्वांनी धारण करावेत. ५) शिव आणि पार्वती या दोघांचा एकत्रित वास असल्यामुळे वैवाहिक दांपत्यजीवन आणि वैवाहिक साथीदाराशी संबंध, वैवाहिक आयुष्यातील अडचणी अशा वैवाहिक प्रश्नांसाठी रुद्राक्ष विशेष लाभदायी सिद्ध झालेला असून, हा रुद्राक्ष वैवाहिक आयुष्यात आनंद, प्रेम आणि सुखाची प्राप्ती करून देतो. ६) पालक आणि पाल्यांतील संबंध अतूट आणि वृद्धिंगत करण्यासाठी रुद्राक्ष विशेष लाभदायी आहे. ७) व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि कीर्ती प्राप्त होण्यासाठी रुद्राक्ष धारण केल्यास लाभदायी आहे. ८) व्यवसायातील साथीदारांशी (भागीदार) चांगले संबंध टिकून राहण्यासाठी रुद्राक्ष लाभदायी. ९) अविवाहित व्यक्तींसाठी विनाविलंब योग्य वैवाहिक जोडीदार मिळण्यासाठी फायदेशीर. १०) रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीस वाढत जाणाऱ्या कर्जातून मार्ग मिळण्यास आणि कर्जातून मुक्तता मिळण्यास सुरवात होते. ११) ज्या व्यक्तीला स्वतःच्याच वाणीमुळे स्वतःचीच चार लोकांत किंवा समाजात मानहानी होत असेल किंवा स्वतःचेच नुकसान होत असेल तर त्यांनी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. वाणीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी रुद्राक्ष विशेष लाभदायी आहे.

स्वतःच्या कुंडलीनुसार एक मुखीपासून ते १४ मुखीपर्यंतचे रुद्राक्ष उपलब्ध असतात.

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top