प्रजासत्ताक दिनाविषयी हे ठाऊक आहे का?

प्रजासत्ताक दिनाविषयी हे ठाऊक आहे का?

प्रजासत्ताक दिन हा देशाच्या लोकशाहीचा एक मोठा सोहळा आहे. प्रजासत्ताक दिनासंदर्भात काही रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? 

  • भारताची राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी सकाळी 10.18 वाजता अंमलात आली. त्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राज्य झाले. 
  • राज्यघटना 26 जानेवारी रोजीच अंमलात आणण्यात आली, यामागेही इतिहास आहे. 26 जानेवारी, 1930 रोजी पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. 
  • भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वांत मोठी लिखित घटना आहे. 
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. राज्यघटना तयार होण्यासाठी दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. 
  • भारतीय राज्यघटनेच्या दोन प्रती हस्तलिखित आहेत. त्यापैकी एक इंग्रजीमध्ये आणि एक हिंदीमध्ये आहे. 
  • राज्यघटनेच्या दोन्ही हस्तलिखित प्रतिंवर तत्कालीन सर्व संसद सदस्यांच्या (308) सह्या आहेत. 
  • 'जन गण मन' या गीतावर भारताचे राष्ट्रगीत म्हणून 24 जानेवारी, 1950 रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले. 
  • 'जन गण मन'चे लेखन आणि चाल रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये तयार केली होती. 
  • 'जन गण मन'चे प्रथम समूहगायन कोलकत्यामध्ये 27 डिसेंबर, 1911 रोजी कॉंग्रेसच्या बैठकीत झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com