#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'

अशोक गव्हाणे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये जर समजा भाजप 220-225  जागांपर्यंत अडकल्यानंतर सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष, सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या मार्गावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे असे लोकांना वाटणार चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येऊ शकते. तेच 2019 मध्ये पंतप्रधान बनले तर आश्चर्य वाटायला नको.

देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल. भाजपचा हा पराभव मोदीसाठी एकूण धोक्याचा इशारा आहे असेच म्हणावे लागेल.

काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही तर, त्यांनी काँग्रेसला देशाच्या राजकारणातून संपवता येऊ शकत नाही हेच सिद्ध केले आहे. त्यामुळे 2019 मध्ये काँग्रेस जरी जिंकली नाही तरी भाजपालाही सहजासहजी विजय मिळणार नाही हे या निकालावरून तरी स्पष्ट झाले आहे. भाजपसमोर 2019 च्या लोकसभा निवडणुका काँग्रेसचे तगडे आव्हान असेल. अशा वेळी 2014 मध्ये मोदीं लाटेत ज्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले त्या पद्धतीने बहुमत मिळणे कठीण दिसत आहे. त्याचबरोबर, 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्याप्रमाणे 13 छोट्यामोठ्या मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात युतीचे सरकार स्थापन केले. परंतु, जर 2019 ला लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तशी परिस्थिती निर्माण झाली तर मित्रपक्ष मोदींना पंतप्रधान म्हणून कितपत पसंती देतील यावर मात्र शंका आहे. कारण; 2014 पासूनची परिस्थिती पाहिल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीचे तसे पहायला गेल्यास मित्रपक्षांसोबत खास असे काही जुळलेले नाही. म्हणूनच 2019 ला भाजपला मित्रपक्षाव्यतीरिक्त सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास नवा चेहरा आणि मोदींना सशक्त पर्याय शोधावा लागेल हेच खरे !

2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये जर समजा भाजप 220-225  जागांपर्यंत अडकल्यानंतर सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष, सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या मार्गावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे असे लोकांना वाटणार चेहरा म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येऊ शकते. तेच 2019 मध्ये पंतप्रधान बनले तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: nitin Gadakri likely to be PM Candiate for BJP In Lok Sabha in 2019