सोनेरी स्वप्न : पुस्तकापेक्षा शेणातून जास्त पैसे !

‘मार्केटिंग खूप गरजेचं असतंय सर. आजच्या काळात मार्केटिंगशिवाय व्यवसाय करणंच अवघड झालंय. मार्केटिंग केलं तर मातीही विकता येते.
Digital
Digital Sakal
Summary

‘मार्केटिंग खूप गरजेचं असतंय सर. आजच्या काळात मार्केटिंगशिवाय व्यवसाय करणंच अवघड झालंय. मार्केटिंग केलं तर मातीही विकता येते.

‘मार्केटिंग खूप गरजेचं असतंय सर. आजच्या काळात मार्केटिंगशिवाय व्यवसाय करणंच अवघड झालंय. मार्केटिंग केलं तर मातीही विकता येते. पण बिनामार्केटिंगचं सोनं विकणंही अवघड आहे,’ असं म्हणत त्यानं चहाचा घोट घेतला आणि मी त्याचं कार्ड पाहू लागलो. माझी एक नवीन पौराणिक कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीला याची माहिती मिळाली आणि त्यांचा प्रतिनिधी कादंबरीच्या मार्केटिंगविषयी मला भेटायला आला. मला मार्केटिंगमधलं फारसं काही कळत नसल्यानं मीही त्याला भेटलो. तसा तो बोलू लागला, ‘तुम्हाला सांगू का सर, तुम्ही पुस्तकात काय लिहिलयं याच्याशी लोकांना काही देणंघेणं नसतं. पुस्तकाचं मार्केटिंग फक्त जोरात झालं पाहिजे. मार्केटिंग असं करायचं ना की लोकांना वाटलं पाहिजे आपण हे पुस्तक वाचलं नाही, म्हणजे आपलं आयुष्य वाया गेलं.’

मला त्यांच म्हणणं काही अंशी पटलं आणि मी म्हटलं, ‘पण पुस्तकामधला मजकूरही महत्त्वाचा आहे ना? दर्जेदार मजकुराला चांगल्या मार्केटिंगची जोड मिळाली तरच खऱ्या अर्थाने चांगली पुस्तकविक्री होईल.’

तसा तो हसत म्हणाला, ‘सर, दर्जेदार पुस्तकांचा विषय सोडा. मार्केटिंग केलेल्या दर्जाहीन पुस्तकांचीही चांगली विक्री होते. कारण आजच्या काळात लोकांचा दर्जापेक्षा मार्केटिंगवर जास्त विश्वास बसू लागलाय.’

कडवट होतं पण त्याचं विधान सत्य होतं. मी शांत झालो. तसा तो पुढं बोलू लागला, ‘‘सर, आजकाल शेणाचं मार्केटिंग केलं तर शेणाचीही चांगली विक्री होऊ शकते. तुमच्या पुस्तकात कितीही दर्जा असूदे. तुम्हाला मी पुस्तकापेक्षा शेणातून जास्त पैसे मिळवून देऊ शकतो.’ असं म्हणत त्यानं त्याच्या फीचा कागद समोर धरला. मी त्याची फी समजावून घेतली आणि म्हणालो, ‘तुमचं शिक्षण काय झालंय?’ तसा तो नीट बसत म्हणाला, ‘सर मी एमबीए केलं आहे. मार्केटिंग हाच माझा स्पेशल सब्जेक्ट होता.’ तसं मी स्मित करत म्हणालो, ‘अभ्यास चांगला केलेला दिसतोय तुम्ही?’ तसा तोही हसत म्हणाला, ‘होय सर मी क्लासमधला टॉपर होतो.’ मी त्याला वरुन खालून न्याहाळलं आणि म्हणालो, ‘म्हणजे तुमच्या अभ्यासातली पुस्तके दर्जेदार होती, म्हणून तुम्ही एवढे हुशार झालात ना? त्या पुस्तकांमध्ये दर्जेदार मजकूर नसता तर कदाचित तुम्ही आज एवढ्या मोठ्या कंपनीत कामाला न लागता चौकात बसून शेणच विकलं असतं ना?’

माझ्या वाक्यावर तो शांतच झाला. दर्जा आणि मार्केटिंग यांची सांगड कशी घालायची हे त्याला व्यवस्थित समजलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com